भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम सुरू आहे. या हंगाम संपल्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून काही खेळाडूंचे पुनरागमन देखील झाले आहे. यात दिनेश कार्तिकचाही समावेश आहे. त्याने ३ वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. मात्र, शिखर धवनला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही, यावरून आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शिखरने (Shikhar Dhawan) आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) चांगली कामगिरी केली आहे. पण, तरीही त्याला भारतीय संघात (Team India) संधी न दिल्याने सुरेश रैनाने (Suresh Raina) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश रैनाच्या मते शिखरच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह शोवर बोलताना रैना म्हणाला, ‘नक्कीच, शिखर निराश झाला असेल. प्रत्येक कर्णधाराला त्याच्यासारखा खेळाडू संघात हवा असतो. तो एक मजेशीर व्यक्ती आहे, जो वातावरण चांगले ठेवतो. त्याने नेहमीच धावा केल्या आहेत, मग तो कोणत्याही स्तरावर खेळला असेल. जर तुम्ही दिनेश कार्तिकला परत संघात आणले आहे, तर शिखर धवनपण जागेसाठी हकदार होता. त्याने मागील ३-४ वर्षे चांगले प्रदर्शन केले आहे आणि सातत्याने धावा केल्या आहेत. तो नक्कीच निराश असेल.’
शिखरने आयपीएल २०२२ मध्ये १४ सामन्यांत ३८.३३ च्या सरासरीने ४६० धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच शिखरने सलग ७ हंगामांमध्ये ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी (India vs South Africa, T20I Series) निवडलेल्या भारतीय संघाबद्दल बोलायचे झाल्यास केवळ दिनेश कार्तिकच नाही, तर हार्दिक पंड्याचे देखील भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तसेच अर्शदीप सिंग, उमरान मलिक यांसारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल नेतृत्व करताना दिसणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्या ३ सामन्यात ३० विकेट्स, ईडन गार्डनवर हॅट्रिक; मग सर्वांपुढे भारतीय संघाला केले लाजिरवाणे
Video: १८८च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारी फलंदाज एका धावेच्या नादात रनआऊट, पाहा तो दुर्देवी क्षण
टीम इंडियात निवड न झाल्याने नितीश राणाने व्यक्त केले दु:ख, ट्वीट करत केले मोठे विधान