---Advertisement---

रैनाने पुन्हा दाखवली आवाजाची जादू; गायक म्हणू लागले, ‘आमच्या पोटावर पाय का देतोय’

On: शुक्रवार, ऑक्टोबर 21, 2022 5:47 PM
suresh raina
---Advertisement---

सुरेश रैना भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज असून त्याने संघाला अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. क्रिकेटव्यतिरिक्त रैनाला गाणे गाण्याची देखील चांगलीच आवड आहे. त्याला अनेकदा गाणे गाणाताना पाहिले गेले आहेत. चाहत्यांना एका गायकाच्या रूपात देखील रैनावर तितकेच प्रेम दाखवतात, जितके एका खेळाडूच्या रूपात दाखवतात. रैनाचा असाच एक सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तो गिटार हातात घेऊन गाणे गाताना दिसत आहे.

सुरेश रैना (Suresh Raina ) याने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत तो गिटार वाजवत आणि गाणेही गात आहे. तो रिटो रिबाचे ‘हीर रांझा’ गाणे गात आहे, जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रैनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मैदानात चेंडूला मारण्याव्यतिरिक्त मी काही नोट्स देखील काढू शकतो, असे तुम्हाला वाटते का? नुकतेच मी हे संदुर गाणे ऐकले आणि तुम्हा सर्वांसोबत हे शेअर करण्याचा विचार होता. अशा आहे, तुम्हाला हे आवडेल.”

रैनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. चाहत्यांना रैना चांगले गाणे गातो हे आधीच माहिती होते, पण या व्हिडिओ तो ज्या पद्धतीने गाण्याचे बोल बोलला आहे, ते पाहून सर्वचण आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओखाली चाहते, त्याचे कुटुंबीय, मित्र आणि संघातील काही सहकाऱ्यांनी कमेंट्स करून कौतुक केले आहे. रैनाची पत्नी प्रियंका रैनानेही या पोस्टच्या कमेंट्स सेक्शनमध्ये हर्ट पोस्ट केले आहे. तसेच क्रिकेटपटू राहुल शर्माने लिहिले की, “पाजी लव इट” (पाजी आवडले). तसेच भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पा यानेही पोस्टवर कमेंट करत रैनाचे कौतुक केले आणि प्रत्साहन देखील वाढवले.

https://www.instagram.com/reel/Cj9n-7aA6yI/?utm_source=ig_web_copy_link

गायक सलमान अली यानेही रैनाच्या पोस्टवर एक मजेशीर कमेंट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. सलमानने लिहिले की, “अरे भाऊ आमच्या पोटावर का लाथ मारत आहेस.” चाहते देखील या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी असे म्हटले आहे की, रैनाने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता त्याने गायक बनले पाहिजे. तर एकाने लिहिले की, अशी एखादी तरी गोष्ट आहे का, जी रैनाला जमत नाही. दरम्यान, रैनाने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत त्याने टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेलेल्या भारतीय संघाला शुभेच्छा देताना दिसला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
साधा सुधा नाय विश्वचषकातील दुसरा लांब षटकार हाय, ओडियन स्मिथच्या जबरदस्त शॉटने वेधले सर्वांचे लक्ष
मुख्य फेरीचे अखेरचे तिकीट झिम्बाब्वेकडे! स्कॉटलंडला नमवत केली ऐतिहासिक कामगिरी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---