---Advertisement---

सुरेश रैनाचे एमएस धोनीला विशेष आवाहन; प्रकरण ऋतुराज गायकवाडच्या भविष्याशी संबंधित

On: शनिवार, ऑगस्ट 31, 2024 1:28 PM
Suresh-Raina-And-MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि दिर्घकाळापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळलेल्या सुरेश रैनाने महेंद्रसिंग धोनीला खास आवाहन केले. आयपीएलच्या सुरुवातीपासून रैना आणि धोनी चेन्नईकडून खेळले आहेत. चेन्नईचे चाहते धोनीला थाला आणि रैनाला चिन्ना थाला म्हणतात. धोनीने आयपीएल-2025 मध्येही खेळावे अशी रैनाची इच्छा आहे. तसेच माजी डावखुऱ्या फलंदाजाने ऋतुराज गायकवाडच्या सुधारणेचे कारण सांगितले आहे.

एमएस धोनीने मागील आयपीएल हंगामापासून कर्णधारपद सोडले आहे. त्यानंतर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र त्याच्या कर्णधारपदात टीम प्लेऑफमध्ये क्वाॅलिफाय करण्यात थोडक्यात हुकली होती.

धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. मात्र त्यानंतर तो सातत्याने आयपीएल खेळत आहे. दरवर्षी आयपीएल आली की धोनीची ही शेवटची आयपीएल असेल अशी चर्चा असते. गेल्या वर्षीही याच विषयावर चर्चा झाली होती. यावेळी धोनी खेळेल की नाही, हे स्पष्ट नाही. मात्र गायकवाडला कर्णधार म्हणून परिपक्व होण्यासाठी आणखी एक वर्ष लागतील म्हणून धोनीने खेळावे अशी रैनाची इच्छा आहे.

स्पोर्ट्स तकशी बोलताना रैना म्हणाला, “मला एमएस धोनीने आयपीएल 2025 मध्ये खेळावे असे वाटते. गेल्या वर्षी त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहता मला त्याला पुढील हंगामात पाहायला आवडेल. तसेच मला वाटते की गायकवाडला अजून एक वर्ष हवे आहे, त्यांनी ज्याप्रकारे कर्णधारपद भूषवले ते लक्षात घेऊन मी हे सांगत आहे. आरसीबीच्या सामन्यानंतर बरेच काही बोलले गेले होते. मात्र, गायकवाडने अप्रतिम कामगिरी केली.

याआधी धोनीने आयपीएलचा पुढचा सीझन खेळू शकतो असे संकेत दिले होते. बीसीसीआयच्या रिटेनशन पॉलिसीवर काय निर्णय घेतला जातो याची तो वाट पाहत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

हेही वाचा-

घातक बाऊन्सर थेट मानेवरच आदळला, फलंदाजानं लगेच सोडलं मैदान; पाहा नक्की काय घडलं
अर्जुन तेंडुलकरचा कहर, फलंदाजीत पाडला चौकार-षटकारांचा पाऊस!
आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल! बीसीसीआय या दोन नियमांचा आढावा घेणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---