भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची टी20 (Ind vs Wi 3rd T20) मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका भारताने आपल्या नावे केली आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला. यासह भारताने टी२० मालिका (IND vs WI T20 मालिका) ३-० ने जिंकली आहे. शेवटच्या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सूर्यकुमार यादवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आणि मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सूर्यकुमार यादवला मालीकावीर म्हणून गौरवण्यात आले.
या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत, त्यासोबत त्याने कॅप्शनमध्ये एक हृदयस्पर्शी गोष्ट लिहिली आहे. सूर्यकुमार यादवने पोलार्डसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तो पोलार्डला मिठी मारताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो पोलार्डच्या खांद्यावर डोके ठेवून उभा आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “भाईचारा चालू आहे”.
&𝙩𝙝𝙚 𝙗𝙧𝙤𝙩𝙝𝙚𝙧𝙝𝙤𝙤𝙙 𝙘𝙤𝙣𝙩𝙞𝙣𝙪𝙚𝙨..💙 pic.twitter.com/qiE8QfU2tW
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) February 21, 2022
तसेच सूर्यकुमार यादवची ही पोस्ट त्याच्या आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सने रिट्विट केली आहे. मुंबईने कॅप्शनमध्ये शोले चित्रपटाचा डायलॉग ‘बहुत याराना लगता है’ लिहिला आहे.
बहुत याराना लगता है 😌💙#OneFamily #MumbaiIndians https://t.co/Y0jK38DuQm
— Mumbai Indians (@mipaltan) February 21, 2022
कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघांसाठी खेळतात. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी२० मालिकेत दोघेही आमनेसामने होते. या संपूर्ण मालिकेत सूर्यकुमार यादवने चमकदार कामगिरी केली. मालिकेतील तीन सामन्यांमध्ये यादवने ५४ च्या सरासरीने आणि १९५ च्या स्ट्राइक रेटने १०७ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि ८ षटकार लगावले. तसेच मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने ३१ चेंडूत ६५ धावांची शानदार खेळी केली.
आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी मुंबईने चार खेळाडूंना संघात कायम ठेवले होते. यामध्ये रोहित शर्मा आणि बुमराहसह कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावाचा समावेश आहे. मुंबईने रोहितला १६ कोटींमध्ये, बुमराहला १२ कोटींमध्ये, सूर्यकुमार यादवला ८ कोटींमध्ये आणि कायरन पोलार्डला ६ कोटींमध्ये संघात कायम ठेवले होते. भारत दौऱ्यावर पोलार्डला फारशी कामगिरी करता आलेली नाही, तर सूर्यकुमार यादवने चमकदार कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
गुजरात जायंट्सवर भारी पडले बंगळुरू बुल्स, मोठा विजय मिळवत दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश
भारताविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर एक दिवसही थांबले नाहीत पाहुणे, त्वरित परतले स्वदेशी
ओदिशाला नमवून माजी विजेत्या बंगलोरने उपांत्य फेरीतील आव्हान अजूनही राखले कायम!