---Advertisement---

मुंबई इंडियन्सच्या ‘या’ दोन महारथींचं टीम इंडियाच्या वनडे संघात पदार्पण!

On: रविवार, जुलै 18, 2021 3:21 PM
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील बहुप्रतीक्षित वनडे मालिका रविवारपासून (१८ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरु झाली. श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातून भारतीय संघासाठी मुंबईचा सूर्यकुमार यादव व झारखंडचा युवा यष्टीरक्षक इशान किशन यांना वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली. याच सामन्यातून दोन्ही संघाचे कर्णधार कारकीर्दीत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करतील.

भारतासाठी दोघांनी केले पदार्पण
युवा खेळाडूंसाठी संधी म्हणून मानल्या गेलेल्या या मालिकेत कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता वाढली होती. भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सूर्यकुमार यादव पदार्पण करणार असल्याचे जाहीर केलेले. मात्र, यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन अथवा इशान किशन यापैकी एकाला संधी मिळणार होते.

संघ व्यवस्थापनाने इशानला वाढदिवसाची भेट देत वनडे पदार्पणाची संधी दिली. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्साठी खेळणाऱ्या या दोन्ही धुरंधरांनी आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील एकाच टी२० सामन्यातून केले होते.

इशान किशनला वनडे पदार्पणावेळी २३५ क्रमांकाची, तर सूर्यकुमारला २३६ क्रमांकाची कॅप देण्यात आली.

https://twitter.com/BCCI/status/1416691495369732099

अशी आहे दोघांची लिस्ट ए कारकीर्द
सूर्यकुमार यादव याने लिस्ट ए कारकिर्दीत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने ९८ सामन्यात ३७.५५ च्या सरासरीने २७७९ धावा केल्या असून, ज्यामध्ये त्याने ३ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली. दुसरीकडे इशानने आपल्या लिस्ट ए कारकिर्दीमध्ये ७७ सामने खेळताना ३६.९० च्या अप्रतिम सरासरीने २५४९ धावा ठोकल्या आहेत.

पहिला वनडे सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन-
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), मनिष पांडे, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव.

महत्त्वाच्या बातम्या – 

राशिद खानचा फलंदाजीत जलवा! टी२० सामन्यात ठोकला विचित्र षटकार, व्हिडिओ व्हायरल

नंबर १ ते ११, वनडेत प्रत्येक फलंदाजी क्रमांकावर सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे ‘हे’ आहेत फलंदाज

लाईव्ह सामन्यात धांय-धांय गोळीबार, प्रेक्षकांसह खेळाडूंचाही उडाला थरकाप; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---