यावर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेचा आठवा हंगाम ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रविवारी (13 नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्ताला पाच विकेट्सने पराभूत करून विजय मिळवला. भारतीय संघ विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार होता, पण उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भारताचा मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव विश्वचषकादरम्यान जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि यासाठी त्याला आयसीसीकडून सन्मान देखील मिळाला आहे.
आयसीसीने टी-20 विश्वचषक 2022 (super strikers in t20 world cup 2022) संपल्यानंतर स्पर्धेदरम्यान सर्वोत्तम घटकेबाजी करणाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला पहिल्या क्रमांकावर जागा मिळाली आहे. या यादीत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाने विश्वचषक स्पर्धेदरम्यान किमान 30 चेंडू खेळल्यानंतर सर्वोत्तम स्ट्राईक रेट असणाऱ्यांना सहभागी केले गेले आहे. विश्वचषकादरम्यान सूर्यकुमारचा स्ट्राईक रेट 159.7 होता आणि त्याने 239 धावा केल्या. यादरम्यान त्याने तीन अर्धशतके केली.
आयसीसीने जाहीर केलेल्या सुपर स्ट्राईकरच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर फिन ऍलेन (Finn Allen) आहे. न्यूंझीलंड संघासाठी त्याने या टी-20 विश्वचषकात खेळलेल्या पाच डावांमध्ये 186.27 च्या स्ट्राइक रेटने 95 धावा केल्या. यादीत तिसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा माजी कर्णधार राशिद खान (Rashid Khan) आहे, राशिदने विश्वचषकादरम्यान एकूण तीन डाव खेळले आणि यामध्ये 178.12 च्या स्ट्राइक रेटने 57 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका संघाचा रिले रुसो आहे. त्याने टी-20 विश्वचषकादरम्यान 169.88 चा स्ट्राइक रेट कायम ठेवत 141 धावा केल्या. आयसीसीने निवडलेल्या या यादीत पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा शादाब खान आहे. शादाबने या स्पर्धेत सहा डावांमध्ये 98 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 168.97 चा होता.
याव्यतिरिक्त भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) देखील टी-20 विश्वचषकात धमाकेदार प्रदर्शन करताना दिसला. विराट या यादीत पहिल्या पाच क्रमांकावर नसला, तरी त्याचे प्रदर्शन मात्र कौतुकास पात्र राहिले. विराटने विश्वचषकातील सहा सामन्यांमध्ये 98.66 च्या सरासरीने सर्वात जास्त 296 धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 अर्धशतकेही केली. (suryakumar yadav became super strikers in t20 world cup 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी: पलटणचा धडाका कायम! बंगालला नमवत केले अव्वलस्थान मजबूत
ब्रेकिंग! टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल ठरला 2022 खेलरत्न पुरस्काराचा मानकरी






