---Advertisement---

टाॅस झाला अन् सुर्याकुमारने चाळीस वर्षापुर्वी मुंबईकरानेच केलेल्या विक्रमाची केली बरोबरी

On: रविवार, जुलै 18, 2021 8:24 PM
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील बहुप्रतीक्षित वनडे मालिका रविवारपासून (१८ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरु झाली. या सामन्यातून भारतीय संघासाठी मुंबईचा सूर्यकुमार यादव व झारखंडचा युवा यष्टीरक्षक इशान किशन यांना वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली. मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने या सामन्यातून वनडे पदार्पण करताना आणखी एका मुंबईकर खेळाडूच्या विक्रमाची बरोबरी केली.

सूर्यकुमारची मुंबईकराशी बरोबरी
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरु झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतातर्फे सूर्यकुमार यादव व इशान किशनने पदार्पण केले. सूर्यकुमार भारतासाठी वनडे खेळणारा २३६ वा क्रिकेटपटू बनला. सूर्यकुमारने ३० वर्ष ३०७ दिवस इतक्या वयात हे पदार्पण केले. मागील चाळीस वर्षात त्याच्यापेक्षा अधिक वय असताना केवळ मुंबईचा यष्टीरक्षक समीर दिघे याने भारतीय संघासाठी पहिला वनडे खेळला होता. पदार्पणावेळी त्याचे वय ३१ पेक्षा जास्त होते.

आयपीएलमधून कमावले नाव
सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. मुंबई इंडियन्ससाठी सलग तीन हंगाम ३५० पेक्षा जास्त धावा काढून त्याने या वर्षी मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. सूर्यकुमार यादवने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एका अर्धशतकाच्या मदतीने २ डावांमध्ये ८९ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची किमया त्याने केली होती.

अशी आहे सूर्यकुमारची कारकीर्द
सूर्यकुमार यादव याने लिस्ट ए कारकिर्दीत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत ९८ सामन्यात ३७.५५ च्या सरासरीने २७७९ धावा चोपल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ३ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली असून, यादरम्यान सूर्यकुमारचा स्ट्राइक रेटही १०० पेक्षा जास्त राहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘कुटुंबात तुमचे स्वागत’, राहुल द्रविडकडून ‘पदार्पणवीर’ सूर्यकुमार आणि इशान किशनला खास शुभेच्छा, व्हिडिओ व्हायरल

वनडे संघाचा कर्णधार बदलण्यात ‘हा’ संघ आहे अव्वल, पाहा टीम इंडिया आहे कोणत्या नंबरवर

इशान किशनला वाढदिवसाचे मिळाले खास गिफ्ट! वनडे पदार्पणासह ‘हा’ विक्रमही झाला नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---