भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नुकताच भारतीय महिला संघाची अष्टपैलू श्रेयंका पाटीलसोबत ‘ऑरा फार्मिंग’ डान्स चॅलेंज केला तेव्हा तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये दोघेही चालत्या गाडीवर मजा करताना नाचताना दिसत आहेत, दोघांनीही एका व्हायरल डान्स ट्रेंडचे अनुकरण केले आहे, जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
ऑरा फार्मिंग डान्स पहिल्यांदाच एका 11 वर्षांच्या आशियाई मुलाने बोट रेस दरम्यान केला तेव्हा ओळखला गेला. त्याच्या एनर्जी आणि डान्स मूव्हजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लवकरच हा डान्स सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाला. यानंतर, आता सूर्या देखील हे डान्स चॅलेंज करताना दिसला. महिला संघाची अष्टपैलू श्रेयंका त्याच्यासोबत होती. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना आवडतोय. सूर्या आणि श्रेयंकाचा डान्स सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
Suryakumar Yadav and Shreyanka Patil in the 'Aura Farming' trend reel. pic.twitter.com/xh60rPVwx5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 25, 2025
अलीकडेच, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 आणि मुंबई टी20 लीगमध्ये खेळल्यानंतर सूर्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या तो बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये मैदानावर परतण्यासाठी त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. सूर्या लवकरच पुन्हा एकदा भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे.
दुसरीकडे, श्रेयंकाला 2024च्या महिला प्रीमियर लीगमध्ये दुखापत झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तिची भारत अ संघात निवड झाली. परंतु ती एनसीएमध्ये फिटनेस चाचणी उत्तीर्ण होऊ शकली नाही. पण आता तिचे लक्ष 2025च्या महिला विश्वचषकावर असेल. तिला पूर्णपणे तंदुरुस्त होऊन लवकरात लवकर मैदानात परतायचे आहे.






