---Advertisement---

सूर्यकुमार यादवची नवीन स्पोर्ट्स कार, वेस्ट इंडीजची धुलाई केल्यानंतर दिले स्वतःलाच गिफ्ट

suryakumar-jonga
---Advertisement---

भारतीय संघाचा स्ट्रार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमार अपेक्षित खेळी करू शकला नाही. पण तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने ताबडतोड अर्धशतक ठोकले. संघाच्या विजयात त्याचे योगदान महत्वापूर्ण राहिले. आता या जबरदस्त प्रदर्शानंतर त्याने स्वतःसाठी एक स्पोर्ट्स कार खरेदी केले आहे. 

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सर्वोत्तम प्रदर्शन करणारा फलंदाज ठरला. त्याने ४४ चेंडूत ७६ धावांची खेळी केली होती. यामध्ये ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमारच्या या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना ७ विकेट्स आणि एक षटक शिल्लक असताना जिंकला. या विजयानंतर भारतीय संघ पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेत १-२ अशा आघाडीवर आहे.

मंगळवारी (२ ऑगस्ट) खेळला गेलेला हा सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमारने चाहत्यांना एक खास बातमी दिली. भारतीय फलंदाजाच्या ताफ्यात आता अजून एक लग्जरी गाडी सामील झाली आहे. अधिकृत इंस्टाग्राम खात्यावून त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ही महागडी ‘पोर्श’ दिसत आहे. इंस्टा स्टोरीला हा व्हिडिओ शेअर करताना सूर्यकुमारने लिहिले आहे की, “डिलीवरीसाठी तायर.” यावरून एक स्पष्ट होते की, या नव्या गाडीची चावी लवकरच सूर्यकुमारच्या हातात येणार आहे.

Suryakumar Yadav Instagram story
Photo Courtesy:Instagram/Screengrabs

दरम्यान, भारतीय खेळाडूंचे वार्षीक उत्पन्न अलिकडच्या काही वर्षांमध्ये लक्षणीयरित्या वाढले आहे. या खेळाडूंमध्ये सूर्यकुमारचा देखील समावेश आहे. माध्यमांतील वृत्तानुसार त्याचे वर्षीक उत्पन्न २० कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल. तो सध्या भारतीय संघासोबतच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे.

सूर्यकुमारला महागड्या आणि लग्जरी गाड्यांची चांगलीच आवड आहे. अलिकडेच तो सोशल मीडियावर ही गोष्ट सर्वांसोबत शेअर देखील करताना दिसतो. सध्या त्याच्या ताफ्यात बीएमडब्लू ५ सिरीजच्या ५३० डी एम स्पोर्ट्स, ऑडी ए ६, रेंज रोवर, फॉर्च्यूनर अशा काही प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. या ताफ्यात आता पोर्श गाडीचाही समावेश झाला आहे. दुचाकी वाहनांमध्ये त्याच्याकडे सुझुकी हायाबुसा आणि हार्ले डेव्हिडसन अशा गाड्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

थेट हृदयावर वार! झंझावाती अर्धशतकानंतर सूर्यकुमारची मन जिंकणारी कृती, Video व्हायरल

बाबर आझमचं अव्वलस्थान धोक्यात! सूर्यकुमार यादवची आयसीसी टी२० क्रमवारीत मोठी उडी

‘सुर्यकुमार यादवने याच क्रमांकावर फलंदाजी करावी’, माजी दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---