भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात वादळी खेळी केली. भारतीय संघाने हा सामना 91 धावांनी जिंकला. सूर्यकुमारने या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील तिसरे टी20 शतक केले, ज्यासाठी सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. मात्र, त्याने या सामन्यानंतर भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्याने आपल्या सिक्रेट कोचचा उलगडा केला.
सध्या टी20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या सूर्याने या सामन्यात त्याच दर्जाची फलंदाजी केली. त्याने 33 चेंडूत आपले 14 वे आंतरराष्ट्रीय टी20 अर्धशतक पूर्ण केले. यानंतर पुढील 50 धावांसाठी त्याने केवळ 12 चेंडू घेत 45 चेंडूवर 6 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने आपले तिसरे टी20 शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत या सामन्यात 7 चौकार व 9 षटकारांच्या मदतीने 112 धावा केल्या.
सूर्यकुमार याला भारतीय संघात दाखल होऊन केवळ दोन वर्षाचा कालावधी झाला आहे. यादरम्यान तो फिटनेस आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय संघाचा आधारस्तंभ बनला. याच मुद्द्याला हात घालत द्रविड यांनी त्याला त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचे व फिटनेसचे रहस्य विचारले. त्याला उत्तर देताना सूर्य म्हणाला,
“याचे रहस्य वगैरे फार काही नाही. केवळ माझी पत्नी देविशाने नेहमी तंदुरुस्त राहण्याचा सल्ला मला दिला. तिने आहारावर देखील विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले. घरी असल्यावर आम्ही क्रिकेटवर भरपूर गप्पा मारतो. दिवसेंदिवस आणखी उत्कृष्ट कसे बनता येईल यावर लक्ष दिले.”
सूर्यकुमारने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने टी20 क्रिकेटमध्ये फलंदाजात पहिले स्थान मिळवले आहे. तसेच, तो सर्वात वेगवान 1500 टी20 धावा बनवणारा फलंदाज देखील आहे.
(Suryakumar Yadav Gives His Success Credit To His Wife Devisha)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कॉलेजला गेलो नाही, पण…’, शिक्षण व्यवस्थेविषयी धोनीने स्पष्ट भूमिका
‘मी काय करतोय, हे मला माहितीये…’, पाहा पत्रकाराच्या कोणत्या प्रश्नावर भडकला बाबर आझम