सूर्यकुमार यादव सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 गाजवल्यानंतर सूर्यकुमार जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारतीय संघात सामील झाला आहे. 7 ते 11 जूनदरम्यान हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. यदरम्यानच सूर्याचा एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यात तो काही मजेशीर प्रश्नांची उत्तरे देताना दिसला.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सरावाला लागले आहेत. सूर्यकुमार यादव () देखील मेहनत घेत आहे. संघाच्या सराव सत्रादरम्यान सूर्यकुमारने ही मुलाखत दिली. बीसीसीआयने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे. सूर्यकुमारला अनेक चाहते आणि संघातील सहकारी खेळाडू ‘स्काय’ या टोपण नावाने ओळखतात. आपल्या टोपण नावामागचा खुलासा सूर्यकुमारने या व्हिडिओतून केला आहे.
सूर्यकुमारने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाचा माजी दिग्गज गौतम गंभीर () याच्यामुळेच त्याला स्काय हे टोपण नाव मिळाले. सूर्यकुमार म्हणाला, “मला वाटते 2014-15 दरम्यान हे नाव मला मिळाले. त्यावेळी मी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळत होतो. त्यावेळी गौतम गंभीरने मला हे नाव दिले होते. सूर्यकुमार यादव खूप मोठं नाव आहे. प्रत्येकाला हे बोलता येत नाही, असे गंभीर म्ङणाला होता. तर अशा पद्धतीने तेव्हा मला हे नाव मिळाले.”
मुलाखतीत सूर्यकुमारला इतरही प्रश्न विचारले गेले. सूर्यकुमाने लंडन हे त्याचे इंग्लंडमधील आवडते शहर असल्याचे सांगितले. तर याठिकाणचे आवडते क्रिकेट मैदान लॉर्ड्स असल्याचेही सूर्या म्हणाला. सूर्यकुमारने संघातील त्या खेळाडूंची नावेही सांगितली, ज्यांच्यासोबत वेळ घालवायला त्याला आवडते. तो म्हणाला, “इथे सगळेच माझे चांगले मित्र आहेत. सर्वांसोबत वेळ घालवायला मिला आवडते. पण ईशान किशन, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासोबत वेळ घालवून चांगले वाटते.” त्याव्यतिरिक्त सूर्यकुमार आपल्या सुपला (स्कूप) शॉटविषयी देखील बोलला. (Suryakumar Yadav himself revealed that he got the name Sky because of Gautam Gambhir)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“भारतात धोनीची पूजा केली जाते”, मायदेशी परतल्यानंतर सीएसकेच्या चॅम्पियनने सांगितले अनुभव
डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन! स्वतः ऑस्ट्रेलियन दिग्गजानेच केली निवड