---Advertisement---

‘सूर्या’ पुन्हा एकदा तळपला! २४९ धावांच्या स्फोटक खेळीत पाडला षटकार-चौकारांचा पाऊस

suryakumar-yadav
---Advertisement---

मुंबई संघाचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यासाठी २०२१ हे वर्ष चांगलेच लाभदायक ठरले. वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध त्याला टी२० पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने श्रीलंकेत वनडे पदार्पण देखील केले. याचबरोबर त्याला कसोटी संघाचा भागदेखील होता आले. आता वर्षाअखेरीस एका स्थानिक स्पर्धेत खेळताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या बॅटची करामत दाखविली आहे. (Suruakumar Yadav Debute)

मागील महिन्यात मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२२ साठी सूर्यकुमार याला कायम केले आहे. सध्या मुंबई क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. मरीन ड्राईव्ह येथील पोलीस जिमखाना मैदानावर ७४ वी निमंत्रित शिल्ड क्रिकेट स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत पारसी जिमखाना संघाकडून खेळताना सूर्यकुमार यादव याने पायडे इलेव्हन संघाविरुद्ध धावांचा अक्षरशः पाऊस पडला. या तीन दिवसीय अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी पारसी जिमखाना (Parsee Gymkhana) संघाने ९० षटकांमध्ये ९ बाद ५२४ धावा केल्या. (Mumbai Cricket)

प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर पारसी जिमखाना संघाच्या मधल्या फळीने हा पहिला दिवस अक्षरशः गाजवून सोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडणार्या सूर्यकुमारने विरोधी संघाच्या गोलंदाजांची धुलाई करत १५२ चेंडूंना सामोरे जाताना ३७ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने २४९ धावांची तुफानी खेळ केली. त्याने पायडे इलेव्हन संघाच्या सर्वच गोलंदाजांना अक्षरशः नामोहरम केले.

आपल्या या खेळीदरम्यान त्याने मुंबईचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आदित्य तरे (Aditya Tare) याच्यासोबत १२४ धावांची भागीदारी केली. तरे ७३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर पाचव्या गड्यासाठी सचिन यादव याच्यासह तब्बल २०९ धावा जोडल्या. आतिफ अत्तरवाला याने सूर्यकुमारला बाद करून संघाला दिलासा दिला. पायडे इलेव्हन संघासाठी कर्णधार सिद्धेश लाड (Siddhesh Lad) याने सर्वाधिक तीन बळी मिळविले.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताला विश्वविजेता बनवणारा ‘हा’ प्रशिक्षक आयपीएलमध्ये मारणार एन्ट्री! अहमदाबादचा बनू शकतो ‘महागुरू’ (mahasports.in)

जगातील कोणत्याही संघाला पुरून उरेल भारताचा हा संघ, १९८३ आणि २०११च्या विश्वविजेत्या खेळाडूंचा आहे समावेश (mahasports.in)

हरभजनच्या निवृत्तीनंतर पत्नीची भावनिक पोस्ट; म्हणाली, ‘त्याला अशी निवृत्ती नको होती, पण..’ (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---