भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या सूर्यकुमार यादवच्या स्वप्नांना ग्रहण लागलं आहे. बुची बाबू स्पर्धेत क्षेत्ररक्षण सूर्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये सूर्यकुमारसह टीम इंडियाचे अनेक वरिष्ठ खेळाडू खेळणार आहेत. मात्र, हाताला झालेल्या दुखापतीनंतर सूर्या या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.
बुची बाबू स्पर्धेत मुंबईसाठी खेळताना तामिळनाडू विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली. सूर्या सामन्याच्या तिसऱ्या डावात लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. मुशीर खानच्या चेंडूवर प्रदोष रंजन पॉलनं लेग साइडवर चेंडू खेळला. चेंडू रोखण्यासाठी सूर्यकुमारनं दोन्ही हातांनी डाईव्ह केलं. परंतु त्याला चेंडू पकडता आला नाही. या प्रयत्नात त्याच्या हाताला दुखापत झाली. यानंतर सूर्यकुमारला तत्काळ मैदानाबाहेर नेण्यात आलं. बीसीसीआयनं अद्याप त्याच्या दुखापतीबाबत कोणतंही अपडेट दिलेलं नाही.
सूर्यकुमारसोबत या सामन्यात खेळणारे सरफराज खान आणि श्रेयस अय्यरसारखे स्टार फलंदाज सपशेल अपयशी ठरले. तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा 286 धावांनी पराभव झाला. पहिल्या डावात तामिळनाडूनं केलेल्या 379 धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईला केवळ 156 धावा करता आल्या. दुसऱ्या डावात 510 धावांच्या आव्हानात्मक लक्ष्यासमोर मुंबईचा संघ केवळ 223 धावांत गारद झाला.
तामिळनाडूसाठी साई किशोरनं दुसऱ्या डावात 5 विकेटसह एकूण 8 विकेट घेतल्या. भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या श्रेयस अय्यरला या सामन्यात केवळ 2 आणि 22 धावा करता आल्या. कर्णधार सर्फराजनं पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 0 धावा केल्या.
हेही वाचा –
कसोटी क्रिकेटमध्ये खळबळ! श्रीलंकेच्या फलंदाजाची गावस्कर-ब्रॅडमन यांच्या खास क्लबमध्ये एंट्री
बांगलादेश मालिकेपूर्वी युवा फलंदाजाचं दमदार शतक, कसोटी संघासाठी ठोकला दावा
दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतर शाहीन आफ्रिदी शॉकमध्ये, पाकिस्तान संघात उभी फूट






