इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील पहिला क्वालिफायार सामना गुरुवारी (5 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवने चमकदार कागमिरी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. सामन्यानंतर त्याने त्याच्या भूमिकेविषयी मत व्यक्त केलं.
सूर्यकुमारने झळकावले हंगामातील चौथे अर्धशतक
नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ प्रथम फलंदाजी करायला मैदानात आला. सलामीवीर रोहित शर्मा डावाच्या सुरवातीलाच बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने संघाची जबाबदारी स्वीकारली आणि ती यशस्वीरीत्या पार पाडली. त्याने 38 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यात 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या हंगामातील सूर्यकुमारचे हे चौथे अर्धशतक होते
फलंदाजीचा घेतला आनंद
सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, “खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त होती. मैदानात दव पडले होते. परंतु परिस्थितीला सकारात्मक पद्धतीने पाहत होतो. मी चांगली फलंदाजी केली. याचा मी पूर्णपणे आनंद घेतला.”
विजयाचा घेऊ आनंद
वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याविषयी तो म्हणाला की, “जेव्हा मी वरच्या क्रमांकावर फलंदाजी करतो तेव्हा बरेच स्वातंत्र्य मिळते. परंतु त्याच वेळी जबाबदारी घ्यावी लागते आणि अखेरपर्यंत फलंदाजी करावी लागते. या क्षणी मी म्हणेन की, आम्ही रात्री विजयाचा आनंद घेऊ आणि पुढे काय होते ते पाहू. मी 500 धावांचा विचार करत नाही. वैयक्तिक कीर्तिमान महत्त्वाचे असतात परंतु काय गरजेचं आहे याला प्राधान्य आहे.”
सूर्यकुमारने या हंगामात केल्या 461 धावा
सूर्यकुमार यादवने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 15 सामन्यात 4 अर्धशतकांच्या मदतीने 461 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 148.23 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
मुंबईने केल्या 200 धावा
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 5 बाद 200 धावा केल्या. मुंबईकडून युवा डावखुरा फलंदाज ईशान किशनने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर सुर्यकुमारने 51 धावांची खेळी केली.
दिल्लीचा झाला पराभव
प्रत्युत्तरादाखल दिल्ली संघाला 20 षटकांत केवळ 143 धावाच करता आल्या. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक 65 धावा केल्या. परंतु संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीच्या संघासाठी कदाचीत रोहित अपेक्षेनुसार फिट नसेल, माजी कर्णधाराचे मोठे वक्तव्य
दिल्लीविरुद्ध दुखापतग्रस्त झालेला बोल्ट फायनलमध्ये खेळणार का? पाहा काय म्हणाला रोहित शर्मा