इंग्लंडविरुद्धची टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला आहे. शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाला या दौऱ्यात २२ जुलैपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळायची आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ २९ जुलैपासून ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. भारतीय संघातील खेळाडू या दौऱ्यात खूपच मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. सूर्यकुमार यादवने असाच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.
भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज सूर्यकमार यादवने हा व्हिडिओ स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. व्हिडिओ सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सोबत इशान किशन (Ishan Kishan) आणि शुबमन गिल (Shubman Gill) दिसत आहेत. बॉलिवुड चित्रपट ‘वेलकम’ मधील एक डायलॉल या व्हिडिओत वापरला आहे. सूर्यकुमार यादव नाना पाटेकरांच्या ‘उदय भाई’ या भूमिकेत दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CgL-PSKIkzC/?utm_source=ig_web_copy_link
सूर्यकुमार आणि इतर खेळाडूंचा हा व्हिडिओ आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओला पसंती मिळत आहे. ४ लाखांपेक्षा जास्त चाहत्यांनी व्हिडिओ लाईक केला आहे, तर कमेंट्स करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
दरम्यान, सूर्यकुमार आणि इशान किशन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी एकत्र खेळताना. दोघांमध्ये चांगली मैत्रीही आहे. सूर्यकुमारने यापूर्वी अनेकदा सांगितले आहे की, मुंबई इंडियन्समध्ये त्याचा सर्वात चांगला मित्र इशान किशन आहे. या दोघांमधील मैत्रीपूर्ण संबंध या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येतात.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ – शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
काय सांगता! आयपीएलच्या ‘या’ फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिकेत विकत घेतलेत ६ टी२० संघ
स्टोक्सने निवृत्ती तर घेतलीच, पण जाता जाता विराटबद्दल बोलून गेला असं काही, वाचाच