इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (IPL 2022)हंगाम अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. २६ मार्चपासून आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात होणार असून २९ मे रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. मात्र आयपीएल सुरू होण्यापूर्वीच ५ वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पहिल्या सामन्यासाठी अनुपलब्ध असू (Suryakumar Yadav To Miss First IPL Match) शकतो. मुंबईचा पहिला सामना २७ मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) संघाविरुद्ध होणार आहे.
मुंबई इंडियन्सने केले होते रिटेन
मुंबई संघाने कर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू कायरन पोलार्ड आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्याबरोबर सूर्यकुमार यादवला यंदाच्या हंगामासाठी रिटेन केले होते. परंतु फेब्रुवारीत वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेदरम्यान सूर्यकुमारला दुखापत झाली होती. त्याच्या हाताचा अंगठा जखमी झाला होता. त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतूनही बाहेर झाला होता. सध्या तो बंगळुरू स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनातून बाहेर जात आहे.
किती गंभीर आहे सूर्यकुमारची दुखापत?
भलेही सूर्यकुमार राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्या दुखापतीवर काम करत असला, तरीही तो वेगाने दुखापतीतून बरा होतो आहे. असे असूनही, तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ट अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले आहे की, भारतीय क्रिकेट बोर्डाच्या मेडिकल टीमद्वारे सूर्यकुमारला आयपीएल सामन्यांमध्ये सलामीला पाठवण्याची जोखिम न घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
जमेची बाजू म्हणजे, दिल्ली संघाविरुद्ध पहिला सामना झाल्यानंतर मुंबईचा दुसरा सामना २ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. अर्थात पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात ५ दिवसांचा फरक आहे, त्यामुळे सूर्यकुमारला तंदुरुस्त होण्यासाठी अधिक अवधी मिळेल.
कर्णधार रोहित आहे विजयरथावर स्वार
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Matches Test Series) नुकतीच पार पडली. रोहितच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने मालिकेतील मोहाली येथे झालेला पहिला सामना १ डाव आणि २२२ धावांच्या फरकाने जिंकला होता. त्यानंतर बंगळुरू येथील दुसरा दिवस-रात्र कसोटी सामनाही भारतीय संघाच्या पारड्यात पडला. भारतीय संघाने २३८ धावांनी हा सामना जिंकला आहे. अशाप्रकारे भारताने २-० च्या फरकाने श्रीलंकेला व्हाईटवॉश (Whitewash To Sri Lanka) दिला आहे. तत्पूर्वी भारतीय संघाने श्रीलंकेला टी२० मालिकेतही ३-० ने क्लिन स्वीप केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
बंगळुरु कसोटीत टीम इंडियाचा ‘श्रेयस’ बनलेला ‘अय्यर’ सामनावीर; संपूर्ण मालिकेतील कामगिरी नजरेत भरणारी
आयपीएल संघांचे पैसे पाण्यात! रबाडा अन् मॅक्सवेलसह ‘हे’ २६ परदेशी खेळाडू मुकणार सुरुवातीचे सामने?
बंगळुरु टेस्ट : डे-नाईट कसोटीमध्ये भारतीय संघाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, ‘या’ यादीत थेट तिसऱ्या स्थानी