भारत आणि नेदरलँड्स संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील 11वा सामना गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) सिडनी येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाच्या तीन शिलेदारांनी विस्फोटक फलंदाजी करत नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा घाम काढला आणि अर्धशतकही साजरे केले. यामध्ये सूर्यकुमार यादव याच्या नावाचाही समावेश आहे. सूर्यकुमारने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक झळकावताच, त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 2 विकेट्स गमावत 179 धावा केल्या आणि नेदरलँड्सला 180 धावांचे आव्हान दिले. यावेळी भारताकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारत आपले अर्धशतक साजरे केले. त्याने यावेळी 25 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी साकारली. त्याच्या या अफलातून खेळीमध्ये 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. यासह त्याने एक विक्रम रचला. यामध्ये त्याने विराट कोहली (Virat Kohli) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनाही मागे टाकले.
That's a brilliant half-century by @surya_14kumar off just 25 deliveries 👌🙌
Scorecard – https://t.co/Zmq1aoK16Q #INDvNED #T20WorldCup pic.twitter.com/9v0qo47U9A
— BCCI (@BCCI) October 27, 2022
सूर्यकुमार यादव हा एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी20 अर्धशतके (Suryakumar Yadav now has the most T20I 50 scores by Indians In a calender year) करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने 2022या वर्षात एकूण 8 अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्यानंतर विराट दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे. विराटने 2016मध्ये एका कॅलेंडर वर्षात एकूण 7 टी20 अर्धशतके केली होती. त्यानंतर त्याने आताच्या म्हणजेच 2022 यावर्षीही 7 टी20 अर्धशतके केली आहेत. यानंतर चौथ्या स्थानी भारतीय सलामीवीर फलंदाज शिखर धवन आहे. धवनने 2018 साली एका कॅलेंडर वर्षात भारतीय संघाकडून खेळताना एकूण 6 अर्धशतके केली होती.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी20 अर्धशतके करणारे भारतीय
8 अर्धशतके- सुर्यकुमार यादव, 2022*
7 अर्धशतके- विराट कोहली, 2016
7 अर्धशतके- विराट कोहली, 2022
6 अर्धशतके- शिखर धवन, 2018
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित, विराट आणि सूर्याने गाजवलं मैदान, विजयासाठी नेदरलँड्सपुढे 180 धावांचे लक्ष्य
आता भारतीय महिलाही होणार मालामाल, पुरुष खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावत कमावणार लाखो रुपये