मागील काही वर्षापासून देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी करत सुर्यकुमार यादव भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत होता. मात्र, त्याला भारतीय संघात संधी मिळत नव्हती. गेल्यावर्षी देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याचा समावेश भारतीय संघात करण्यात आला नव्हता. त्याबद्दल अनेक दिग्गजांनीही भारतीय निवड समीतीलवर टीका केली होती. पण अखेर, सुर्यकुमारच्या मेहनतीला यश आले आहे. त्याची अगामी इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यातील या घटनांबद्दल त्याने भाष्य केले आहे.
मागीलवर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा झाली होती, तेव्हा आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये सुरु होता. त्यावेळी भारतीय संघात सुर्यकुमारला संधी मिळेल अनेक अनेकांना वाटले होते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे त्यावेळी काय भावना होत्या, याबद्दल सुर्यकुमारने इंडिया टूडे बोलताना खुलासा केला आहे.
तो म्हणाला, ‘खरंतर मी एकटाच बीचवर फेरफटका मारायला गेलो. मी माझ्या पत्नीला सांगितले की मी एक तासभरात परत येतो. मला विचार करायचा होता. मला योजना आखायच्या होत्या की पुढील काही सामन्यांत कसे खेळायचे आहे, कारण पुढे काही महत्त्वाचे सामने होते. माझ्यासाठी हे खुप महत्त्वाचे होते की चांगली कामगिरी करुन संघाला विजय मिळवून देईल. मी फक्त इतकंच म्हणालो की मला थोडा वेळ द्या. मी फक्त एक फेरफटका मारुन परत येतो, त्यानंतर माझ्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य असेल.’
सुर्यकुमारने पुढे सांगितले की ‘जेव्हा मी मुंबई इंडियन्सच्या टीम रुममध्ये आलो तेव्हा अनेक खेळाडू तिथे बसले होते आणि ते मला येऊन सांगत होते की मी अजून मेहनत घ्यावी आणि योग्य वेळ आणि संधी येण्याची वाट पाहावी. त्यांनी मला सांगितले की एकदिवस नक्कीच माझी भारतीय संघात निवड होईल.’
तसेच आता अखेर भारतीय संघात निवड झाली असल्याबद्दल सुर्यकुमार म्हणाला, तो भारतीय संघात सामील होण्यास आणि काही वरिष्ठ खेळाडूंबरोबर वेळ घालवण्यास उत्सुक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“मला वाटलं चहल माझ्याबरोबर मस्करी करत आहे’, टीम इंडियातील निवडीबद्दल तेवतियाने केला खुलासा
राशिद खानच्या जबरा ‘हेलिकॉप्टर शॉट’ने परदेशी क्रिकेटरला लावले वेड; म्हणाली, “मलाही शिकव”






