कानपुरमध्ये गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरु होणाऱ्या भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेच्याआधी एक मोठी बातमी हाती येताना दिसत आहे. यजमान भारताच्या कसोटी संघात एका नव्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने सूर्यकुमार यादवला न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात संधी दिली आहे. त्याला केएल राहुलऐवजी संधी देण्यात आली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार केएल राहुल दुखापतीमुळे २ सामन्यांच्या या कसोटी मालिकेतून बाहेर गेला आहे. त्याच्या डाव्या मांडीच्या स्नायुंमध्ये ताण आल्याने त्याला या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे. तो आता बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत या दुखापतीतून सावरण्यासाठी दाखल होईल. त्याच्या समोर पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी तंदुरुस्त होण्याचे आव्हान असेल.
सूर्यकुमार यादव नुकताच न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत खेळला होता. तसेच त्याआधी इंग्लंड दौऱ्यातील कसोटी सामन्यांसाठीही सूर्यकुमारची कसोटी संघात निवड करण्यात आली होती. पण, त्याला अंतिम ११ जणांमध्ये संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आता त्याला न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
तसेच केएल राहुल ऐवजी निवड झालेल्या सूर्यकुमार यादवने मर्यादित षटकांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे, तरी अजून कसोटीमध्ये त्याला खेळताना पाहण्याची उत्सुकता कायम आहे. त्याचबरोबक न्यूझीलंड विरुद्ध २ कसोटी सामन्यात त्याला अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळते की नाही हे पाहावे लागणार आहे. यासाठी त्याची टक्कर श्रेयस अय्यर सोबत आहे. अय्यरलाही अजून कसोटी संघात खेळण्याची संधी नाही मिळाली.
न्यूझीलंडविरुद्ध २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान कानपूर येथे, तर ३ ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईमध्ये भारतीय संघ कसोटी सामना खेळणार आहे.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अगरग्रवाल, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा. (विराट कोहलीला पहिल्या कसोटीसाठी विश्रांती दिली आहे. पण तो दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करुन संघाच्या नेतृत्त्वाचीही जबाबदारी सांभाळेल.)
महत्त्वाच्या बातम्या –
टीम पेनचा राजीनामा, आता ‘हे’ ३ खेळाडू होऊ शकतात ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचे नवे कर्णधार
अश्विन म्हणतोय केवळ त्यालाच नाही, तर ‘या’ प्रमुख खेळाडूलाही दिल्ली कॅपिटल्स संघात कायम करणार नाही
तुफानी फलंदाजी! वनडेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज