भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. तर या दौऱ्यावर भारतीय संघाला श्रीलंका विरुद्ध 3 एकदिवसीय आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौर्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादवचा देखील समावेश आहे. त्याने नुकतीच या दौऱ्याबद्दल विविध गोष्टींवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान त्याने श्रीलंकेचा विश्वचषक जिंकणारा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने भारतीय संघाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भारतीय खेळाडूंच्या प्रतिक्रियेबद्दलही भाष्य केले आहे.
रणतुंगाने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यावर ‘दुसऱ्या श्रेणीतील संघ’ पाठविला आहे, जो श्रीलंका क्रिकेटचा एक प्रकारचा अपमानच आहे. याच वक्तव्यावर सूर्यकुमार यादवने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली की, रणतुंगाच्या या वक्तव्याकडे खेळाडू लक्ष देत नाही. खेळाडू फक्त या मालिकेचा आनंद घेणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक अनुभवी खेळाडूंना भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यांच्या अनुपस्थितीत अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. याचबद्दल रणतुंगा यांनी निराशा व्यक्त केली होती.
भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवला मंगळवारी झालेल्या आभासी पत्रकार परिषदेदरम्यान विचारले होते की, अर्जुन रणतुंगाने केलेल्या वक्तव्यावर तुझे काय मत आहे. सुर्यकुमार यादव म्हणाला की, “मला या गोष्टीवर काहीच बोलायचे नाही. सध्या आमचे पूर्ण लक्ष एकदिवसीय आणि टी20 मालिकेवर आहे. सध्या ज्याप्रकारे संघाचा सराव चालू आहे आणि काल आम्ही ज्याप्रकारे सामना खेळलो, हे सर्व आम्ही केलेल्या योजनेनुसारच सुरू आहेत. आम्ही रणतुंगाने केलेल्या वक्तव्याबद्दल कसला ही विचार करत नाही. आम्ही फक्त मजा करण्यासाठी आणि मालिकेचा आनंद घेण्यासाठी येथे आलो आहोत आणि येथून बऱ्याच सकारात्मकतेसह भारतामध्ये परत जाणार आहोत.”
रणतुंगाने जे वादग्रस्त वक्तव्य केले आहे, त्यानंतर काही वेळातच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने देखील एक वक्तव्य केले होते. जामध्ये श्रीलंका क्रिकेट बोर्डाने म्हटले होते की, भारताने मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी जो 20 खेळाडूंचा संघ पाठविला आहे, त्यामधील अनेक खेळाडूंनी तिन्ही स्वरूपातील क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. म्हणून हा दुसऱ्या श्रेणीतला संघ नाही. श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाच्या या वक्तव्यानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि पाकिस्तानचा माजी फिरकीपटू डॅनिश कनिरिया यांनी देखील त्याच्याविरूद्ध प्रतिक्रिया दिली होती.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या –
असा उचलावा ब्रेकचा फायदा! ‘या’ दोन भारतीय धुरंधरांनी इंग्लंडमध्ये घेतला कॉफीचा आनंद
इंग्लंड-भारत कसोटी मालिकेत पुन्हा घुमणार प्रेक्षाकांचा आवाज, पंतप्रधानांची मोठी घोषणा