इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये मंगळवारी (10 नोव्हेंबर) अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पाच गडी राखून पराभव करून आयपीएल कारकिर्दीतील 5 वा किताब जिंकला. या सामन्यात रोहीतने मुंबईकडून सर्वाधिक 68 धावा करून विजयात मोलाची कामगिरी बजावली. मात्र, असे असूनही सोशल मीडियावर मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचीच चर्चा होतेयं.
दिल्लीने केल्या 156 धावा
या महत्वपूर्ण सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्ताखालील दिल्लीने नानेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर मार्कस स्टॉयनिस तंबूत परतला. अनुभवी फलंदाज अजिंक्य राहणे (2 धावा) आणि शिखर धवन (15 धावा) यांनाही काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर श्रेयस अय्यर (65 धावा) आणि रिषभ पंत (56 धावा) यांनी 96 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.त्यांच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीला 20 षटकांत 156 धावा करता आल्या.
रोहितला वाचवण्यासाठी सूर्यकुमारने स्वत:ची दिली विकेट
प्रत्युत्तरादाखल मुंबईची धावसंख्या 45 असताना सूर्यकुमार यादव क्रीजवर फलंदाजी करायला आला. तथापि, डावाच्या 11 व्या षटकात रोहितने फिरकीपटू आर अश्विनने फेकलेल्या चेंडूवर मिड-ऑफच्या दिशेने फटका मारला. दुसऱ्या टोकावर उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवने त्याला धाव घेण्यास नकार दिला. मात्र, रोहितने धाव घेतली आणि तो दुसऱ्या टोकाला येऊन पोहोचला. त्यावेळी रोहित आणि यादव एकाच टोकाला होते.
यावेळी दिल्लीचा क्षेत्ररक्षक प्रवीण दुबेने धावत येऊन चेंडू यष्टीरक्षक रिषभ पंतकडे फेकला. त्यावेळी सूर्यकुमार यादव क्रीजमध्ये थांबला असता, तर रोहित धावबाद झाला असता. परंतु रोहितला वाचवण्यासाठी त्याने क्रीज सोडली आणि तो स्वतः धावबाद झाला.
सूर्यकुमार यादवचा हा निःस्वार्थी निर्णय पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचे चांगलेच कौतुक केले आहे.
https://twitter.com/ipl2020highlite/status/1326207622916280322?s=19
https://twitter.com/awarastick/status/1326409450828259329
https://twitter.com/AdityaMohan100_/status/1326236135476006912
It's when Surya Kumar Yadav sacrifices his wicket to save Rohit Sharma being Run Out. #NowIsWow
— Monis Khan (@ItsMonis) November 10, 2020
Rohit Sharma: #SuryakumarYadav is a more matured player. The kind of form he was in, I should have sacrificed my wicket for Surya. Throughout the tournament, he has been incredible#IPL2020 #MI
Captain ,Leader ,Conqueror 👑
Not just a great player but truly a great person 🙏— Sidhaant Aadhhathrao (@SidAdat17) November 10, 2020
https://twitter.com/BeinggRana45/status/1326230861168041984
@surya_14kumar sacrificing his wicket for a well set Rohit Sharma was a big moment in the match for me apart from the team's victory💙💯 This man is just pure class both on & off the field!! Respect & a huge bow down for this player🙌
Who else feels the same?#MIvsDC
— BpS (@im_bps7) November 10, 2020
मुंबईने मिळवला विजय
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबईने 18.4 षटकांत 5 गडी गमावून 157 धावा केल्या आणि सहजपणे विजय मिळवला.या सामन्यात रोहित व्यतिरिक्त मुंबईचा युवा प्रतिभावान फलंदाज ईशान किशनने 19 चेंडूत 33 धावांची आक्रमक खेळी करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली.
ईशान किशनने मुंबईकडून केल्या सर्वाधिक धावा
ईशान किशन मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या हंगामातील 14 सामन्यात 519 धावा केल्या.यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता. 99 ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सच्या पाचही आयपीएल विजेत्या संघात रोहित व्यतिरिक्त केवळ ‘हा’ खेळाडू होता सहभागी
रोहित ‘सुपरहिट’ ! अंतिम सामन्यात अर्धशतक करत रचला अनोखा विक्रम
IPL – आत्तापर्यंतचे ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर’ पुरस्कार मिळवणारे खेळाडू