इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांचा राहिला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने चांगली सुरुवात करत, पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. मात्र नंतर भारताचे विश्वासाचे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. ज्यात प्रामुख्याने कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी चाहत्यांना पुन्हा निराश केले. कोहली जेम्स अँडरसनच्या पहिल्याच चेंडूत बाद झाला. तर पुजाराने केवळ ४ धावा केल्या. त्यामुळे पुजाराच्या भारतीय संघातील स्थानावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुजारा गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघात अनेकदा स्थान मिळूनही पुजाराकडून म्हणावी तशी कामगिरी झालेली नाही. अनेक वेळा गरजेच्या वेळी पुजारा संघासाठी धावा करण्यात अपयशी ठरला आहे. म्हणून पुजाराला लवकरच संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्य पदाच्या अंतिम सामन्यातही पुजारा अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला अनेकांच्या निंदेला सामोरे जावे लागले होते. परंतु तरीही त्याला इंग्लंड विरुद्ध खेळण्यास संघात संधी दिली गेली. मात्र तो इथेही अपयशी ठरला.
पुजाराने २०१९ मध्ये त्याचे शेवटचे शतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते, ज्यात त्याने १९३ धावा केल्या होत्या. तसेच या मालिकेत पुजाराने सर्वाधिक ५२१ धावाही केल्या होत्या. पुजराचा या दमदार खेळीने भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर ऐतिहासिक विजय मिळवला होता.
मात्र आता तो दुहैरी धावसंख्याही करू शकत नाहीये. पुजाराने इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या कसोटी सामन्यात चांगली खेळी नाही केली. तर, त्याला संघातून वगळण्यात येऊ शकते. तसेच त्याच्या जागी सध्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवला संघात संधी मिळू शकते.
सूर्यकुमार यादव सध्या इंग्लंडमध्ये विलगीकरणात आहे. सूर्यकुमार सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका दौऱ्यातही त्याने कमालीची फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. याचाच परिणाम म्हणून त्याचा इंग्लंड दौऱ्यात समावेश करण्यात आला आहे. तसेच पुजाराची फलंदाजी अशीच जर असमाधानकारक राहिली तर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर लवकरच त्यांची जागा घेऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या –
–शाकिब अल हसनचा अद्भुत विक्रम; टी२०त ‘अशी’ कामगिरी करणारा बनला जगातील पहिला क्रिकेटपटू
–त्या राहुल सारखाच हा राहुल आहे; ‘या’ दिग्गज गोलंदाजाने द्रविडशी केएलची केली तुलना
–ऑसी गोलंदाजाने टी२० पदार्पणातच केला हॅट्रिकचा कारनामा, तरीही संघ बांगलादेशविरुद्ध पराभूत