भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये उद्यापासून (४ ऑगस्ट) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतून शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. त्यांच्याऐवजी पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना भारतीय कसोटी संघात संधी देण्यात आली आहे. हे दोघेही खेळाडू अखेर आज (३ ऑगस्ट) इंग्लंडला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. याची माहिती सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.
श्रीलंका दौऱ्यावर चमकदार कामगिरी करणारे सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ हे गेल्या आठवड्यातच इंग्लंडला रवाना होणार होते. परंतु, श्रीलंका संघाविरुद्ध दुसरा टी-२० सामना सुरू होण्यापूर्वी कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामळे तो मालिकेतून बाहेर झाला होता. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना देखील आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. यामध्ये सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांचाही समावेश होता.
त्यामुळे या खेळाडूंना इंग्लंडला जाण्यास उशीर झाला आहे. आज हे दोघेही इंग्लंडला रवाना झाले आहेत. इंग्लंडसाठी उड्डाण भरण्यापुर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीतील दोघांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना इंग्लंडला जाण्याची परवागनगी मिळाली आहे.
सूर्यकुमार यादवने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत इंग्लंडला निघाले असल्याची माहिती दिली आहे. त्याने आपला व पृथ्वी शॉचा विमानात बसलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने, “मला मिळालेल्या आशिर्वादांमुळे.. आता पुढील स्टॉप इंग्लंड,” असे लिहिले आहे.
पहिला कसोटी सामना खेळण्यापासून राहणार वंचित
इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे या खेळाडूंना व्हिजा मिळण्यात अडचणी येत होत्या. परंतु क्रिकेटपटू असल्यामुळे यांना व्हिजा देण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमावलीनुार, इंग्लंडला पोहचल्यानंतर त्यांना कमीत कमी १० दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यानंतर हे खेळाडू खेळण्यास सज्ज होतील. त्यामुळे ते दोघेही पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना दिसून येणार नाहीत. (Surykumar yadav and Prithvi shaw started their journey to go to England, photos went viral on social media)
Counting my blessings 💫
Next stop, England! pic.twitter.com/0uuiKfvDRB— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) August 3, 2021
https://www.instagram.com/p/CSGKSXQoxPD/?utm_source=ig_web_button_share_sheet
अशी आहे सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांची कारकीर्द
सूर्यकुमार यादवने याचवर्षी वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत ७७ सामन्यात ४४ पेक्षा ही जास्तीच्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १४ शतके झळकावली आहेत. तसेच आयपीएलमधील प्रभावी प्रदर्शनानंतर त्याला भारतीय संघात जागा मिळाली आहे. आता इंग्लंड दौऱ्यावर कसोटी स्वरुपातही पदार्पण करू शकतो.
तर पृथ्वी शॉने ५ कसोटी सामन्यात ४२ पेक्षा जास्तीच्या सरासरीने ३३९ धावा केल्या आहेत. त्याने २०१८ मध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात त्याने तुफानी शतक झळकावले होते. परंतु गतवर्षी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात फ्लॉप ठरल्यानंतर त्याला संधी मिळालीच नाही. त्यानंतर त्याला संघाबाहेर देखील करण्यात आले होते. त्यामुळे या दौऱ्यावर त्याला पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीने ६ वर्षांपूर्वी ‘तो’ सल्ला दिला, म्हणूनच मी चांगला फलंदाज बनलो; जडेजाचा मोठा उलगडा
जसप्रीत बुमराहचा अनोखा सराव, चक्क बॅटिंग पॅड घालून केली गोलंदाजी; प्रतिक्रियांचा आला पूर
उडानानंतर श्रीलंकेचे आणखी काही क्रिकेटर घेऊ शकतात निवृत्ती, एक तर देश सोडण्याच्या तयारीत!