---Advertisement---

एअर इंडिया कॉलनीमधील ‘त्या’ घरामध्ये सुशांत ‘त्याच’ ठिकाणी जमिनीवर जाऊन झोपला

On: शुक्रवार, जानेवारी 21, 2022 1:55 PM
Sushant Singh Rajput
---Advertisement---

सन २०१६मध्ये भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रकाशित झाला होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने धोनीची भूमिका साकारली होती. धोनीची भूमिका साकारणारा दिवंगत अभिनेता सुशांतचा गुरुवारी (२१ जानेवारी) ३६ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

एमएस धोनीचा सर्वात जवळचा मित्र आणि चित्रपट निर्माता अरुण पांडेने काही महिन्यांपूर्वी सुशांत सिंग राजपूत यांच्या धोनीवर आधारित चित्रपट बनवत असतानाच्या काही आठवणी सांगितल्या होत्या. ज्या कधीच न विसरता येणार्‍या आहेत. 

सुशांत सिंग राजपूतने धोनीवर आधारित ‘एमएस धोनी:अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. धोनीसारखी हुबेहुब भूमिका करता यावी यासाठी अनेकांकडून मार्गदर्शन घेतले.

चित्रपट निर्माता पांडे यांनी पीटीआयशी बोलताना म्हणाले होते की, “चित्रपटात आपण धोनीची भूमिका योग्य पद्धतीने करू शकतो की नाही या कारणाने सुशांत खूपच चिंतेत होता. 2016 साली चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तो प्रचंड दबावात होता. तो मला म्हणाला होता की, मला आशा आहे या चित्रपटात खूप चांगलं काम करेल. अन्यथा माहीचे लाखो प्रशंसक मला कधीच माफ करणार नाही.”

ते म्हणाले, “हेलिकॉप्टर शॉटचा सराव करत असताना सुशांतचा स्नायू दुखावला होता. त्यामुळे आम्हाला असे वाटले की, तो आता काही दिवस आराम करेल आणि पुन्हा चित्रपटाच्या सेटवर कमबॅक करेल. त्याच्यामुळे कुणालाही उशीर होऊ नये, यासाठी तो एका आठवड्यातच पुन्हा सराव करण्यासाठी मैदानावर आला.”

पांडे म्हणाले, सुशांत नेहमी माहीला सतत प्रश्न विचारायचा. दोघेही बिहारचे असल्यामुळे त्यांच्या मैत्रीत चांगला ताळमेळ बसला होता. (झारखंड बिहार राज्यापासून वेगळे झाले आहे.) मी, माही आणि सुशांत दिल्ली येथे धोनीच्या एअर इंडिया कॉलनी घरांमध्ये गेले होतो. त्यावेळी धोनी तो कुठे बसायचा?  कुठे जेवण करायचा? या सगळ्या गोष्टींची माहिती देत होता. घरामध्ये असेही एक ठिकाण होते ज्या ठिकाणी माही जमिनीवर झोपत होता. धोनी हे सांगत असताना सुशांत ही त्याच ठिकाणी जमिनीवर तेथे जाऊन झोपला. धोनीची भूमिका करायला मिळाल्यामुळे सुशांत स्वतःला भाग्यवान समजत होता. चित्रपटात धोनीची भूमिका मिळेल असे त्याला कधी स्वप्नातही वाटले नव्हते. तो खूपच जिंदादिल माणूस होता. लॉकडाऊनपूर्वी आम्ही एका जिममध्ये भेटले होतो. त्यानंतर आम्ही नियमित संपर्कात होतो. सुशांत या जगात नाही या गोष्टीवर विश्वासच बसत नाही.”

महत्त्वाच्या बातम्या – 

वेंकटेशला मिळणार डच्चू? दुसर्‍या वनडेत अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

चक्क सचिन तेंडुलकरचे पैसे बुडवले? अखेर सचिनचाही ‘ही’ लीग खेळण्यास नकार

केव्हा, कुठे आणि कधी रंगणार दक्षिण आफ्रिका-भारत दुसरा वनडे सामना; जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---