---Advertisement---

चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत स्वस्तिक, अमर क्रीडा मंडळ संघाचा बादफेरीत प्रवेश

On: शनिवार, जानेवारी 4, 2020 12:00 PM
---Advertisement---

मुंबई। चिंचपोकळी सार्वजनिक उसत्व मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत स्वस्तिक क्रीडा मंडळ, महाराष्ट्र कबड्डी संघ राहटणी पुणे, जय भारत, जॉली क्रीडा मंडळ, अमर क्रीडा मंडळ संघाचा बादफेरीत प्रवेश केला.

दुसऱ्या दिवशी ड गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ विरुद्ध महाराष्ट्र कबड्डी संघात झालेल्या सामन्यांत स्वस्तिक ३६-२३ असा विजय मिळवत गटात विजयी राहिले. मध्यंतरापर्यत १९-११ अशी स्वस्तिककडे आघाडी होती. चढाईत अक्रम शेख पकडीत विक्की वाजले व निलेश शिंदे यांच्या खेळाच्या जोरावर स्वस्तिकने सहज विजय मिळवला.

ड गटात महाराष्ट्र कबड्डी संघाचा दुसरा सामना श्री हनुमान सेवा मंडळ यांच्या विरुद्ध झाला. दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढत होती. मध्यंतरापर्यत १३-०९ अशी क्षुल्लक आघाडी महाराष्ट्र कबड्डी संघाकडे होती. मात्र मध्यंतरानंतर आक्रमक खेळ करत महाराष्ट्र कबड्डी संघाने ३२-१४ असा विजय मिळवला. चेतन थोरात, प्रसाद जखोले, सुमीत विचारे, अमोल नखाले यांनी चांगला खेळ केला.

ग गटात गोल्फादेवी संघाने जय बजरंग रायगड संघावर ४६-४४ असा विजय मिळवला. तर जय बजरंग संघाने दुसऱ्या लढतीत २७-२६ असा शिवशक्ती संघावर विजय मिळवला. आता ग गटातील गोल्फादेवी विरुद्ध शिवशक्ती यासामन्यावर सगळ्याचे लक्ष असेल. त्या सामन्यावर गटातील तीन पैकी कोणते दोन संघ बादफेरीत प्रवेश करतील हे अवलंबून असणार आहे

इ गटात बंड्या मारुती विरुद्ध केदारनाथ क्रीडा मंडळ यांच्यात चांगली लढत झाली. १५-१५ असा मध्यंतरापर्यत बरोबरीत सामना होता. सुशील कदम, आकाश कदम व पवन मोरे यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर केदारनाथ क्रीडा मंडळाने ३५-२७ असा विजय मिळवला. बंड्या मारुती कडून जितेश सातपे व मंगेश होडगे चांगले बरे खेळले. विजय नवनाथ विरुद्ध बंड्या मारुती ही लढत महत्वपूर्ण असणार आहे.

जय भारत संघाने स्व आकाश क्रीडा मंडळ संघावर ४३-१६ असा विजय मिळवला. स्व आकाश गटातील दोन्ही सामने पराभूत झाल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. अ गटात जॉली विरुध्द जय भारत हा सामना विजयी व उपविजयी साठी महत्वपूर्ण असेल.

रेल्वे पोलीस बॉईज विरुद्ध अंकुर स्पोर्ट्सने गटातील पहिला सामना ४१-३४ असा जिंकला. अंकुर कडून सुशांत साईल व किसन बोटे यांनी चांगला खेळ केला. तर रेल्वे पोलीस बॉईज कडून रोहित जाधव बरा खेळला. अमर क्रीडा मंडळाने युवा स्पोर्ट्सवर ३७-२२ असा विजय मिळवत गटात सर्व लढती जिंकत बादफेरीत प्रवेश केला. उर्वरित साखळी सामने तिसऱ्या दिवशी होणार असून दोन उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने ही तिसऱ्या दिवशी खेळण्यात येणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---