बिग बॅश लीग 2020 या स्पर्धेतील 14 वा सामना शनिवारी (26 डिसेंबर) सिडनी थंडर आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात सिडनी थंडर संघाने 129 धावांनी मेलबर्न रेनेगेड्स संघावर ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय टी-20 क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत मिळवलेला दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला.
टी-20 क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा विजय
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सिडनी थंडर संघाने 20 षटकात 8 गडी गमावून 209 धावसंख्या उभारली होती. मेलबर्न रेनेगेड्स संघाला विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मेलबर्न रेनेगेड्स संघ 12.2 षटकात सर्वबाद 80 धावा करू शकला. त्यामुळे सिडनी थंडर संघाने टी-20 क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने सर्वात मोठा दुसरा विजय नोंदवला.
टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय
यापूर्वी 2010 साली पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघात टी-20 सामना झाला होता. ज्यामधे पाकिस्तान संघाने 5 विकेट्स गमावून 203 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने फक्त 60 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तान संघाने टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय साकारला होता.
एक ही अर्धशतक झाले नाही
सिडनी थंडर आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मजेशीर गोष्ट म्हणजे या संघाने इतका मोठा विजय मिळवला. मात्र, या संघात एकाही खेळाडूने अर्धशतकी खेळी केली नाही. सिडनी थंडर संघाकडून ऑलिव्हर डेविस याने सर्वाधिक जास्त 48 धावांची केली. मात्र, तरीही सिडनी थंडर संघाने 209 धावांचे लक्ष्य उभारले.
सिडनी संघाची धावसंख्या 8 बाद 209
सिडनी थंडर संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 209 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ओलिवर डेविसने सर्वाधिक जास्त 48 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर उस्मान ख्वाजा 34, हेल्स 35 आणि फर्ग्युसनने 31 धावांची खेळी केली होती. त्यानंतर इतर कोणता खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. मेलबर्न रेनेगेड्सकडून गोलंदाजी करताना पीटर हॅटझोग्लो आणि केन रिचर्डसन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तसेच विल आणि झॅक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
मेलबर्न रेनेगेड्स संघाची धावसंख्या 10 बाद 80
मेलबर्न रेनेगेड्स संघाने 210 धावांचा पाठलाग करताना 12.2 षटकात सर्वबाद 80 धावा केल्या. रेनेगेड्स संघाकडून ऍराॅन फिंच याने सर्वाधिक 20 धावांची खेळी केली. त्याचबरोबर रिली रॉस्यूने 17 धावांची खेळी केली. मात्र, या संघातील इतर खेळाडूंना दुहेरी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. थंडर संघाकडून गोलंदाजी करताना तन्वीर संघा याने सर्वाधिक जास्त गडी बाद केले. त्याने 14 धावा देताना 4 गडी बाद केले. त्याचबरोबर ऍडम मिल्ने आणि ख्रिस ग्रीन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तसेच डॅनियल सॅम्स आणि नॅथन मॅकएँड्र्यू यांनीही प्रत्येकी 1 बळी मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
अपने साथ मत जोडिये, हम अलग है! मयंक पुन्हा अपयशी ठरताच भन्नाट मिम्स व्हायरल
कौतुकास्पद! पदार्पणवीर सिराजचे हनुमा विहारीने वाढवले मनोबल; ‘हे’ होते कारण
‘बॉक्सिंग डे’ सामन्यातून कसोटी कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारे भारतीय खेळाडू, ही आहेत नावे