---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : गतविजेत्या कर्नाटकाचा पराभव, पंजाबचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश

On: मंगळवार, जानेवारी 26, 2021 10:34 PM
---Advertisement---

आजपासून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली. यातील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात मनदीप सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाबच्या संघाने कर्नाटकाचा पराभव केला. गतविजेत्या कर्नाटकला ९ गडी राखून हार पत्करावी लागली. त्यामुळे आता पंजाब संघाने उपांत्य फेरीत मजल मारली आहे.

कर्नाटकाच्या फलंदाजांची हाराकिरी 

अहमदाबादच्या नूतन मोटेरा मैदानात खेळवल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकाचा संघ संपूर्ण २० षटके देखील खेळू शकला नाही. पंजाबच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव ८७ धावांवर संपुष्टात आला. पंजाबकडून वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने ३ तर अर्शदीप सिंग, संदीप शर्मा आणि रमण सिंग यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

स्टार खेळाडूंचा भरणा असलेली कर्नाटकची फलंदाजी या सामन्यात मात्र ढेपाळली. त्यांच्याकडून केवळ चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. अनिरुद्ध जोशीची ३४ चेंडूतील २७ धावांची खेळी कर्नाटकच्या डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.

पंजाबने केला सहज पाठलाग

या लक्ष्याचा पाठलाग पंजाबने १ गडी गमावून सहज पूर्ण केला. त्यांचा सलामी फलंदाज अभिषेक शर्मा ४ धावांवर स्वस्तात माघारी परतला. मात्र त्यांनतर यष्टीरक्षक प्रबसिमरन सिंग आणि कर्णधार मनदीप सिंग ८५ धावांची अभेद्य भागीदारी करत पंजाबचा विजय सुनिश्चित केला. प्रबसिमरन सिंगने ३७ चेंडूत ४९ धावांची नाबाद खेळी केली, तर मनदीप सिंगने ३३ चेंडूत ३५ खेळी केली. आता पंजाब मुश्ताक अली स्पर्धेच्या विजेतेपदापासून अवघे दोन पावले दूर आहे.

महत्वाच्या बातम्या:

भारतीय संघात हार न मानण्याची वृत्ती वाढली, माजी इंग्लिश कर्णधाराची स्तुतिसुमने

IND Vs ENG: विराट कोहलीसाठी डोकेदुखी; अश्विन, सुंदर आणि कुलदीपमध्ये कुणाची करावी निवड? 

‘या’ खेळाडूवर लागेल १९ कोटीची बोली, आकाश चोप्राने वर्तविला अंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---