---Advertisement---

4 षटकार अन् 9 चौकार, अजिंक्य रहाणेचं रौद्र रुप पाहून गोलंदाजांना काहीच सुचेना!

Ajinkya Rahane (Mumbai Ranji Team)
---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या सामन्यात मुंबईनं आंध्र प्रदेशचा 4 गडी राखून पराभव केला. मुंबईसाठी अजिंक्य रहाणेनं चमकदार कामगिरी केली. त्यानं 95 धावांची स्फोटक खेळी केली. रहाणेचं शतक हुकलं, मात्र तो संघाला विजयापर्यंत घेऊन गेला. रहाणेनं या खेळीत 9 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार मारले. रहाणेसह पृथ्वी शॉ आणि सूर्यांश शेडगे यांनी महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या.

प्रथम फलंदाजी करताना आंध्र प्रदेशनं 229 धावा केल्या होत्या. संघासाठी केएस भरतनं स्फोटक खेळी खेळली. त्यानं 53 चेंडूंचा सामना करत 93 धावा केल्या. भरतनं 8 चौकार आणि 4 षटकार मारले. कर्णधार रिकी भुईनं 68 धावांची खेळी केली. त्यानं 31 चेंडूंचा सामना करत 7 चौकार आणि 4 षटकार मारले. अश्विन हैबरनं 52 धावांची दमदार खेळी केली.

मुंबईसाठी धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे सलामीला आले. 15 चेंडूत 34 धावांच्या दमदार खेळीनंतर पृथ्वी बाद झाला. मात्र रहाणे खेळपट्टीवर ठाम राहिला. त्यानं 54 चेंडूंचा सामना करत 95 धावा केल्या. रहाणेच्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. कर्णधार श्रेयस अय्यरनं 11 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानं 3 षटकार ठोकले.

अखेरच्या षटकांमध्ये सूर्यांश शेडगेनं मुंबईसाठी धुमाकूळ घातला. तो विजयाचा हिरोही ठरला. त्यानं केवळ 8 चेंडूंचा सामना करत नाबाद 30 धावा केल्या. सूर्यांशच्या या खेळीत 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. सूर्यांशनं आपल्या आक्रमक फलंदाजीनं गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मुंबईसाठी शिवम दुबेनं देखील 18 चेंडूत 34 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली.

हेही वाचा – 

आयपीएल फ्रॅन्चाईजींंची ब्रॅन्ड व्हॅल्यू जाहीर; मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानी, पहिल्या क्रमांकावर कोणती टीम?
ब्रेट लीचा खतरनाक चेंडू अन् कमेंटेटरचा डोळा थोडक्यात वाचला!
ॲडलेड दिवस-रात्र कसोटी भारतात किती वाजता सुरू होणार? प्रत्येक सत्राची वेळ जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---