भारतातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईच्या वरिष्ठ संघाची निवड लवकरच करण्यात येणार आहे. अशामध्ये भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर नुकत्याच खेळण्यात आलेल्या सराव सामन्यांमध्ये सपशेल फ्लॉप ठरला. ‘डी’ संघाकडून खेळताना अर्जुनने सर्व सामन्यांमध्ये केवळ ४ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे फलंदाजीमध्येदेखील त्याला खास कामगिरी करता आली नाही. त्याने ३ डावांमध्ये केवळ ७ धावा केल्या.
अर्जुनच्या या कामगिरीनंतर त्याची वरिष्ठ मुंबई संघात निवड होण्याची शक्यता फार कमी आहे. त्याने ‘सी’ संघाविरुद्ध गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. यानंतर दुसऱ्या सामन्यात ‘बी’ संघाविरुद्ध त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३३ धावा देत १ विकेट आपल्या खिशात घातली.
सूर्यकुमार यादवने अर्जुनच्या एकाच षटकात ठोकल्या तब्बल २१ धावा
‘ए’ संघाविरुद्ध खेळताना अर्जुन तेंडुलकरचा इकोनॉमी रेट हा ९ धावांच्याही पुढे गेला होता. कारण त्याने तब्बल ३७ धावा खर्च केल्या होत्या. चौथ्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. मात्र, त्याने १५ चेंडूत २१ धावा दिल्या. ‘बी’ संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवने अर्जुनच्या तिसऱ्या षटकात २१ धावा ठोकल्या होत्या.
निवडकर्त्यांचे लक्ष अर्जुन तेंडुलकरवर
मुंबई क्रिकेट असोसिएशन पुढील काही दिवसांमध्ये संघाची निवड करण्यासाठी तयार आहे. आणि सर्वांच्या नजरा अर्जुन तेंडुलकरवर असतील. जर अर्जुनची निवड केली, तर त्याची वरिष्ठ संघात निवड करण्याची ही पहिली वेळ असेल. भारताच्या १९ वर्षांखालील कसोटी संघाचा माजी सदस्य अर्जुनला वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघात नेटमध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. तो नुकताच आयपीएल २०२० दरम्यान मुंबई इंडियन्स संघासोबत नेट गोलंदाज म्हणून युएईला गेला होता.
असे होते सराव सामन्यात मुंबईचे ४ संघ-
संघ ए-
श्रेयस अय्यर (कर्णधार), आकाश गोयल, प्रसाद पवार, धवल कुलकर्णी, दीपक शेट्टी, आदित्य धुमाळ, सर्फराज खान, शशांक अत्तार, सागर मिश्रा, सुफियान शेख, कुणाल थोरात, अथर्व पुजारी, अंजुल पुजारी, अंजदीप लाड, मनदीप लाड
संघ बी-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक तमोर, तुषार देशपांडे, आतिफ अतरवाला, विनायक भोईर, सुजित नायक, सिद्धेश लाड, अदीब उस्मानी, तनुश कोटियन, खिजर दफादार, सिद्धार्थ अकरे, मोहित अवस्थी, अग्नी चोप्रा, आकिब कुरेशी, कल्पेश सावंत
संघ सी-
आदित्य तरे (कर्णधार), रोस्टन डायस, शिवम दुबे, शम्स मुलानी, शुभम रंजने, अंकुश जयसवाल, रौनक शर्मा, साईराज पाटील, केविन डी अल्मेडा, अखिल हेरवाडकर, श्रेयस गुरव, अमित पांडे, रोहन राजे, प्रशांत सोलंकी, प्रयाग भाटी
संघ डी-
यशस्वी जयसवाल (कर्णधार), गौरीश जाधव, आकाश पारकर, भूपेन लालवानी, अरमान जाफर, चिन्मय सुतार, धृमिल मटकर, अमन खान, अर्जुन तेंडुलकर, आशय सरदेसाई, कृतिक हनागवाडी, परिक्षित वलसंगकर, सलमान खान, सक्षम झा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतात जन्मलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटरचे निधन; घेतल्यात हजाराहून अधिक विकेट्स
‘बॉक्सिंग डे’ कसोटी : पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या ३ बाद २२२ धावा, केन विलियम्सन शतकाच्या जवळ
व्वा! संघनायक असावा तर असा, ‘त्या’ एका कृतीने अजिंक्य रहाणेने जिंकली कोट्यवधी क्रिकेट रसिकांची मने






