---Advertisement---

रेकाॅर्डब्रेक..! टी20 मध्ये वनडे इतकी टोटल, 20 षटकांत या संघाने ठोकल्या चक्क 349 धावा

On: गुरूवार, डिसेंबर 5, 2024 11:41 AM
---Advertisement---

एक काळ असा होता की वनडेमध्ये 300 धावा करणे खूप कठीण होते. अनेक संघ एकूण स्कोअर 250 च्या जवळपास गेल्यावरही सामने जिंकायचे. पण तेव्हापासून आता काळ खूप बदलला आहे. आता वनडे सोडा, टी20 मध्ये सुद्धा 300 पेक्षा जास्त स्कोअर होऊ लागला आहे. दरम्यान आता बडोदा क्रिकेट संघाने देखील अशी कामगिरी केली आहे. जी यापूर्वी कधीही घडली नव्हती. बडोद्याने टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर बडोदा संघाने या सामन्यात अनेक नवे विक्रम केले आहेत.

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत आज (5 डिसेंबर) गुरुवारी बडोदा आणि सिक्कीमचे संघ आमनेसामने होते. बडोदा संघ प्रथम फलंदाजीला उतरला, तेव्हा आज एक मोठा विक्रम होणार आहे. याचा अंदाज कोणालाच आला नसेल. बडोदा संघ येताच अशा चौकार-षटकारांचा पाऊस पडला की आज काहीतरी मोठे घडणार आहे. असे वाटू लागले. बडोद्याचे सलामीवीर शाश्वत रावत आणि अभिमन्यू सिंग राजपूत यांनी विस्फोटक शैलीत फलंदाजी केली.

सहाव्या षटकात संघाची पहिली विकेट पडली. तोपर्यंत संघाने 92 धावा केल्या होत्या. या धावसंख्येवरून संघाने कोणत्या शैलीत फलंदाजी केली असेल हे समजू शकते. अभिमन्यूने बाद होण्यापूर्वी केवळ 17 चेंडूत 53 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 षटकार आणि 4 चौकार लगावले. तर दुसरा सलामीवीर शाश्वत रावतने संघासाठी 16 चेंडूत 43 धावा जोडल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेला भानू पुनियाने सिक्कीमच्या गोलंदाजांना अक्षरक्ष: फोडून काढले. त्याने 51 चेंडूत 134 धावा केल्या. ज्यात त्याने खेळीत 15 षटकार आणि 5 चौकार हणले.

शेवटी 20 षटकांच्या अखेरीस फलंदाजांनी संघाची धावसंख्या 349 धावांवर नेली. टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने या फॉरमॅटमध्ये एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे. एवढेच नाही तर बडोद्याने सामन्यादरम्यान एकूण 37 षटकार मारले. टी20 मध्ये कोणत्याही एका संघाने मारलेला सर्वाधिक षटकार आहे. याआधी, काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वे विरुद्ध गांबिया यांच्यातील सामन्यात झिम्बाब्वेने एका डावात 27 षटकार ठोकले होते. आता अवघ्या काही दिवसांतच हा विक्रम मोडीत निघाला आहे.

हेही वाचा-

IND VS AUS; ॲडलेडची खेळपट्टी फलंदाजांची डोकेदुखी? सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट!
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत अंतिम निर्णय लवकरच, आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह यांची काही तासांत महत्वाची बैठक
वयाच्या 22 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा, आता हा भारतीय क्रिकेटर झाला 70 हजार कोटी रुपयांचा मालक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---