भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज टी नटराजन मागील जवळपास दोन वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळताना दिसला होता. त्यानंतर आता आपल्या गावी परतल्यानंतर त्याने आपल्या महत्त्वकांक्षी क्रिकेट अकादमी सुरू करण्याच्या निर्णयाला मूर्त स्वरूप दिले. शुक्रवारी (23 जून) भारतीय संघाचा वरिष्ठ खेळाडू दिनेश कार्तिकी याच्या हस्ते त्याने आपल्या गावी या अकादमीचे उद्घाटन केले.
Dinesh Karthik inaugurated the Natarajan cricket ground. pic.twitter.com/wu6GieGSuu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 23, 2023
नटराज याने मागील वर्षीच आपण आपल्या गावात क्रिकेट अकादमी सुरू करण्याची घोषणा केली होती. तमिळनाडूतील सालेम जिल्ह्यातील चिनप्पापट्टी हे त्याचे गाव आहे. भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाल्यानंतर त्याने आपल्या गावातील तरुण खेळाडूंना याचा फायदा व्हावा म्हणून हे मैदान बनवण्याचा निर्णय घेतलेला.
नटराजन क्रिकेट क्लब नावाने सुरू झालेल्या या मैदानावर चार खेळपट्टी असतील. तसेच कॅन्टीन व 100 प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था या मैदानावर केली गेली आहे. नटराजन याने 10 जून रोजी आपल्या गावकऱ्यांना सांगितले होते की, 23 जून रोजी मैदानाचे उद्घाटन केले जाईल. या उद्घाटन सोहळ्याला कार्तिकसह वॉशिंग्टन सुंदर व साई किशोर हे तमिळनाडूचे क्रिकेटपटू हजर होते. साई किशोरने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
नटराजन याने टेनिस बॉल क्रिकेट खेळत आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली होती. तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीनंतर त्याला भारतीय संघात देखील स्थान मिळाले. त्याने भारतासाठी आतापर्यंत एक कसोटी, दोन वनडे व चार टी20 सामने खेळले आहेत.
(T Natarajan Inaugurate Cricket Academy In Own Village Dinesh Karthik Chief Guest)
महत्वाच्या बातम्या-
शमीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे संघातून का वगळलं? खरं कारण आलं समोर, लगेच वाचा
टीम इंडियात निवड झाल्यानंतर आली यशस्वीची प्रतिक्रिया, म्हणाला, “त्या तिघांकडून खूप शिकलो”