टी-20 विश्वचषक 2026 आज, शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. भारतीय संघ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, तर दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी संध्याकाळी 6.30 वाजता मैदानावर येतील.
भारतीय संघाचे नेतृत्व कर्णधार सूर्यकुमार यादव करत आहे. गतविजेत्या भारताने आपले विजेतेपद टिकवण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे, तर गेल्या टी-20 विश्वचषकात सुपर-6 मध्ये स्थान मिळवलेल्या अमेरिकेनेही 2026च्या स्पर्धेसाठी चांगली तयारी केली आहे.
हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध भाषांमध्ये थेट पाहता येईल. जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवरही थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. जिओहॉटस्टारवर इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांसोबतच बंगाली, भोजपुरी आणि हरियाणवीसारख्या प्रादेशिक भाषांमध्येही प्रक्षेपण उपलब्ध असेल. मोबाईलवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी, व्हर्टिकल लाइव्ह फीड आणि ३६०° मल्टी-कॅम वैशिष्ट्य देखील उपलब्ध आहे.
मोफत पाहण्यासाठी, डीडी स्पोर्ट्स हा एक पर्याय उपलब्ध आहे. हे चॅनल फक्त भारताच्या सामन्यांसाठी एचडी प्रक्षेपण प्रदान करते आणि डीडी फ्री डिश वापरकर्ते हा सामना विनामूल्य पाहू शकतात.
दोन्ही संघाचे स्क्वाॅडः
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग
अमेरिका: मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंग, अँड्रीज गॉस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शयान जहांगीर, साईतेजा मुक्कमला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नॉस्टुश केनजिगे, शाइडली व्हॅन शाल्कविक, सौरभ नेत्रावळकर, अली खान, मोहम्मद मोहसिन, शुभम रंजने






