आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीने २०२१ टी२० विश्वचषकाचे आयोजन नियोजित वेळेतच भारतात होणार असल्याचे गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सांगितले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले की, स्पर्धेचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यात कसलीही कसर सोडणार नाही. भारतात येणाऱ्या १५ संघांना सर्वप्रकारची सुरक्षा देण्यात येईल.
विश्वचषकात आरोग्याशी संबंधित सर्व सुविधा देण्यात येतील
“या स्पर्धेत बीसीसीआय आरोग्याशी संबंधित सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करेल. मला विश्वास आहे की, आम्ही सर्व आव्हाने पार करू. कोरोना काळात कठीण आव्हाने आहे. परंतु मी आयसीसीला आश्वासन देऊ इच्छितो की या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असे जय शाह यांनी सांगितले.
खेळाडूनंतर प्रशासकाच्या स्वरुपात वेगवेगळे आव्हान
दुसरीकडे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीचे म्हणणे आहे की, विश्वचषकाचे आयोजन करणे त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे आव्हान असेल. गांगुलीने म्हटले, “मी आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एक खेळाडू म्हणून खूप मजा केली आहे. मला माहिती आहे की, या स्पर्धेचे वातावरण खूप रोमांचक असते. कारण करोडो लोक आपल्याला पाहत असतात. परंतु यावेळी मी एक प्रशासक म्हणून आपली भूमिका आणि जबाबदारी निभावण्यासाठी तयार आहे. आम्ही विश्वचषक २०२१ चे आयोजन करण्यासाठी तयार आहोत.”
आयसीसीच्या सीईओने बीसीसीआयला दिल्या शुभेच्छा
आयसीसीचे सीईओ मनू साहनी यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे लक्ष या स्पर्धेचे आयोजित सुरक्षितरीत्या करण्यावर आहे. जेणेकरून जगाला याचा आनंद घेता येऊ शकेल.
साहनी यांनी बीसीसीआयला युएईत आयपीएलचे यशस्वी आयोजन करण्यासाठीही शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, “यामुळे आपल्याला विश्वचषकासारख्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात मदत मिळेल.”
२०२१ विश्वचषकात १६ संघ घेणार भाग
सन २०२१ मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकात यजमान भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, अफगाणिस्तान, आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड, ओमान, पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलँड यांसारखे संघ भाग घेतील.
सन २०२० आणि २०२१ मध्ये सलग २ टी२० विश्वचषकाचे आयोजन होणार होते. २०२० विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलिया करणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे हे स्थगित करण्यात आले. आता या स्पर्धेचे आयोजन २०२२ मध्ये होईल. आयसीसीने यावर्षी ऑगस्टमध्ये याची घोषणा केली होती. यापूर्वी भारताने २०१६मध्ये टी२० विश्वचषकाचे यजमानपद स्विकारले होते. हा विश्वचषक वेस्ट इंडिज संघाने जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलियाला सापडला नवा पॉटींग, भारताविरुद्ध कसोटी मालिकेत करणार पदार्पण
-भारीच ना! आयपीएल २०२१मध्ये असणार ‘इतके’ संघ, तब्बल ७६ सामन्यांची प्रेक्षकांना मेजवानी?
-विरेंद्र सेहवागने तयार केला सर्वोत्तम आयपीएल संघ, विराट कोहली कर्णधार तर रोहित शर्मा…
ट्रेंडिंग लेख-
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
-आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान
-रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर