पाकिस्तानविरुद्ध रविवारी (23 ऑक्टोबर) विराट कोहलीची बॅट तळपली. काही दिवसांपूर्वी खराब फॉर्ममुळे विराट कोहली याला ट्रोल करणारे आज त्याचे पुन्हा कौतुक करू लगाले आहेत. विराटने टी-20 विश्वचषक 2022 ची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी करून केली. नाबाद 82 धावांची खेळी केल्यानंतर त्याला सामनावीर निवडले गेले. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ब्रेट लीच्या मते विराटवर काही दिवसांपूर्वी टीका करणाऱ्यांना त्याचे विक्रम किंवा आकडेवारी माहिती नसावी.
यावर्षीच्या आशिया चषकात विराट कोहली (Virat Kohli) त्याचा जुना फॉर्ममध्ये दिसला. आशिया चषकात अफिगाणिस्तानविरुद्ध खेळताना विराटने शतकांचा दुष्काळ संपवला. मागच्या जवळपास तीन वर्षांपासून चाहते विराटच्या शतकाची वाट पाहत होते आणि विराटने चाहत्यांची ही प्रतिक्षा संपवली देखील. आता टी-20 विश्वचषकात देखील विराटचा हाच फॉर्म कायम असल्याचे पाहायला मिळाले. त्याने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक अभियानाची सुरुवात केली. अवघ्या 53 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने विराटने नाबाद 82 धावा कुटल्या. या प्रदर्शनानंतर विराटने त्याच्या टीकाकारांची तोंडे मात्र नक्कीच बंद केली आहे. ब्रेट ली (Brett Lee) यानेही विराटवर टीका करणाऱ्यांची खैर केली नाहीये.
लिजेंड्स लीग क्रिकेटच्या एखा कार्यक्रमात ब्रेट ली बोलत होता. यावेळी त्याने विराटचे तोंड भरून कौतुक केले. ब्रेट लीच्या मते विराटसाऱ्या खेळाडूला कुणीच जास्त काळ शांत ठेवू शकत नाही. तो म्हणाला, “जेव्हा विराटसारख्या खेळाडूवर प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटते. ज्यांनी विराटवर टीका केली होती, त्यांना त्याचे विक्रम माहीत नसावेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने काय योगदान दिले आहे, हे त्यांना माहिती नसावे. अनेकदा तुम्ही शतके किंवा अर्धशतके करू शकत नाही. हे प्रोफेशनल स्पोर्ट्सचा एक भाग आहे. मला एवढेच माहितीये की, विराट कोहली हा या खेळाचा एक दिग्गज खेळाडू आहे. अशा खेळाडूंना मोठ्या काळासाठी शांत ठेवता खूप कठीण असते.”
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा विचार केला, तर भारताने चार विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 159 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘टी-20 क्रिकेटमध्ये युवराजने केलीये भारतासाठी सर्वोत्तम खेळी, विराटची खेळी दुसऱ्या क्रमांकावर’
दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये वादळ! प्लेसिसच्या आत्मचरित्रात अनेक धक्कादायक खुलासे; केली गंभीर वक्तव्ये