---Advertisement---

नो बॉलवर ‘असा’ धावबाद झाला असता मोहम्मद रिझवान? वाचा काय सांगतो क्रिकेटचा नियम

On: गुरूवार, नोव्हेंबर 10, 2022 3:00 PM
babar azam mohammad rizwan (1)
---Advertisement---

बुधवारी (9 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट ग्राउंवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक लढत पाहायला मिळाली. टी-20 विश्वचषक 2022 चा हा पहिला उपांत्य सामना होता, जो 7 विकेट्स राखून पाकिस्तानने नावावर केला. या सामन्यात एक असा प्रसंगा पाहायला मिळाला, ज्यामध्ये मोहम्मद रिजवान एका फुलटॉस चेंडूवर झेलबाद झाला आणि क्षेत्ररक्षकाने त्याला धावबाद देखील केले. मात्र, पंचांनी त्याला झेलबाद दिले कारण चेंडू नो बॉल नव्हता.

हा प्रसंग पाकिस्तानच्या डावातील 17 व्या षटकात घडला. या षटकात ट्रेंट बोल्ट गोलंदाजी करत करत होता आणि षटकातील शेवटच्या चेंडू त्याने फुलटॉस टाकला. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) या चेंडूवर पुढे येऊन खेलला होता. बोल्टने हा चेंडू थोडा पुढे टाकण्याच्या प्रयत्नात होता, पण तो फुलटॉस झाला. रिझवान क्रिजपासून जास्त पुढे होता आणि याच कारणास्तव मैदानात उफस्थित पंचांनी हा नॉ बॉल दिला नाही. मात्र न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षणांना तिसऱ्या पंचांच्या निर्णयाविषयी शंका होती, ज्यामुळे त्यांना रिझवानला धावबाद देखील केले. क्षेत्ररक्षकांनी त्याला धाबवाद करून काही फायदा झाला नसला, तरी अनेकांना याविषयी अनेक प्रश्न पडले आहेत. तिसऱ्या पंचांनी जर हा नो बॉल दिसला असता, तर रिझवानला झेलबाद देता आले असते की नाही हे आपण जाणून घेऊ

क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था म्हणजे मेरिलबोन क्रिकेट क्लब यांनी या नियमाविषयी माहिती दिली आहे. नियमांनुसार तिसऱ्या पंचांनी चेंडू नो बॉल दिला, तर रिजवानला धावबाद देता आले नसते. कारण खेळाडूंनी चेंडू झेलल्यानंतर तो डेड होतो. एकदा डेड झालेला चेंडू पुन्हा खेळात आणता येत नाही. पण मैदानी पंचांनी जर नो बॉल दिला असता, तर मात्र रिझवान धावबाद झाला असता. कारण मैदानी पंचांनी नो बॉल दिल्यानंतर जर झेल घेतला गेला, तर चेंडू डेड होत नाही.

दरम्यान, बोल्टने टाकलेला हा चेंडू जास्त उंचीवर होता आणि मैदानी पंचांनी देखील नो बॉल दिला असता. परंतु रिझवान क्रिज सोडून पुढे आल्यामुळे पंचांनी नो बॉल दिला गेला नाही. उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर न्यूझीलंडने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये न्यूझीलंड संघ 4 विकेट्सच्या नुकसानावर 152 धावांपर्यंत पोहोचू शकला. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 19.1 षटकांमध्ये 3 विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ स्वतः सह या पाच जणांना मानतो टी20 चे सुपरस्टार; सूर्या-विराटला नाही स्थान
पाकिस्तानच्या विजयाने आयसीसी ट्रोल; चाहत्यांनी म्हटले, ‘दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडला पंचांच्या मदतीने…’ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---