क्रिकेटविश्वात पुरूषांच्या टी20 विश्वचषकाला (T20 World Cup) आजपासून (रविवार 16 ऑक्टोबर) झाली. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध नामिबिया यांच्यात खेळला जात आहे. त्या सामन्याआधीच श्रीलंका संघाला मोठा झटका बसला. त्यांंचा स्टार वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे त्याच्यावर या स्पर्धेतूनच बाहेर पडण्याची वेळ आली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका हा टी20 विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
दिलशान मधुशंका शनिवारी (15 ऑक्टोबर) झालेल्या सरावात जखमी झाला असून त्याला लवकरच एमआरआय स्कॅनसाठी पाठवण्यात आले. रिपोर्ट्स आल्यावरच कळेल की त्याची ही दुखापत किती मोठी आहे. विश्वचषक सुरू झाल्याने तो लवकर बरा होईल याची शक्यताही खूपच कमी आहे. यामुळे तो पहिल्याच सामन्याला मुकला आहे. त्याच्याजागी नामिबियाच्या सामन्यात प्रमोद मधुशान याला अंतिम अकरामध्ये घेतले.
मधुशंकाने आशिया चषक 2022च्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण केले होते. या स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याने 6 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्याजागी संघात लाहिरू कुमारा हाही संघात आहे, मात्र बिनुरा फर्नांडो हा त्याच्याजागी योग्य खेळाडू आहे, कारण तोही डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. बिनुरा टी20 विश्वचषकाच्या संघात नाही. सध्यातरी श्रीलंका क्रिकेट बोर्डने मधुशंका याच्या जागी बदली खेळाडूचे नाव जाहीर केले नाही. तसेच मधुशंकाला राखीवमध्ये ठेवले आहे.
मधुशंकाकडे पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये उत्तम गोलंदाजी करण्याचे कौशल्य आहे. तो श्रीलंकेचा दुष्मंथा चामीरा नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा फेव्हरेट वेगवान गोलंदाज असल्याने त्याचे अंतिम अकरामधील स्थान जवळपास पक्केच होते. त्यातच ही दुखापत झाल्याने त्याचे कारकिर्दीतील पहिला विश्वचषख खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.
नुकताच आशिया चषक जिंकूनही, सुपर 12साठी पात्र होण्यासाठी ग्रुप ए मधील श्रीलंकेला विश्वचषक स्पर्धेची पहिली फेरी खेळावी लागत आहे. जिथे ते नामिबिया व्यतिरिक्त युएई आणि नेदरलँड्सशी दोन हात करणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष- सहा चेंडूत सहा षटकार खेचणाऱ्या शार्दुल ठाकुरविषयी काही खास माहिती
टी-20 विश्वचषकात ‘या’ तिघांचे प्रदर्शन विसरता येणार नाही, एका हंगामात केल्यात सर्वाधिक धावा