टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup)ला सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. यासाठी भारताने राखीव खेळाडूंसह मुख्य संघ 15 सप्टेंंबरच्या आधीच जाहीर केला. रोहित शर्मा या विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. तो पहिल्यांदाच एखाद्या आयसीसी स्पर्धेमध्ये भारताचे कर्णधारपद सांभाळणार आहे. ही स्पर्धा 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात खेळली जाणार आहे. यासाठी भारतीय संघामध्ये काही बदल झाले आहेत. संघामध्ये दोन वेगवान गोलंदाजांना जागा देण्यात आली आहे.
भारताच्या राखीव खेळाडूमध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami), दीपक चाहर, श्रेयस अय्यर आणि रवि बिश्नोई यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज यांना राखीव खेळांडूमध्ये सामील केले गेले आहे. जसप्रीत बुमराह हा पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. सिराज आणि उमरान यांच्या संघात येण्याने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही ही संभावना स्पष्ट होताना दिसत आहे.
बुमराह खेळणार की नाही याबाबत प्रश्न निर्माण केले जात असताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्याच्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले “बुमराह अद्याप विश्वचषकातून बाहेर गेला नाही. विश्वचषक सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस अवधी आहे. आपण काही काळ थांबावे. घाईत काहीतरी वक्तव्य करणे चुकीचे ठरेल.”
जसप्रीत बुमराह याची दुखापत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यातून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला चार ते सहा महिने लागतील असे बोलले जात आहे.
रेवस्पोर्ट्सच्या रिपोर्ट्सनुसार, सिराज आणि उमरान भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. शमी आताच कोरोनातून मुक्त झाला आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेसाठी बुमराहच्या जागी सिराजला संघात घेतले आहे. त्याने आयपीएल 2022मध्ये फॉर्ममध्ये परतण्यासाठी प्रयत्न केले. त्याने 15 सामन्यांमध्ये 10.06च्या इकॉनॉमी रेटने नऊच विकेट्स घेतल्या आहेत. तर उमरानसाठी आयपीएल 2022चा हंगाम चांगला राहिला. त्याने 14 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या आहेत. तर आयर्लंड विरुद्ध पदार्पण केल्यानंतर त्याने 3 सामन्यात केवळ 2 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताकडे बुमराहच्या व्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग आणि हर्षल पटेल या वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्या अष्टपैलूच्या भुमिकेत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहली हालवू शकतो टीव्ही चॅनलची टीआरपी! माजी इंग्लिश गोलंदाज केला खुलासा
मीराबाईचा सुवर्ण धडाका सुरूच! राष्ट्रीय स्पर्धेतही केली विक्रमी कामगिरी
‘शमी नव्हेतर या गोलंदाजाला द्यावी विश्वचषकात संधी’; माजी निवडकर्त्याने सुचविला पर्याय