भारताचा एक संघ ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाची (T20 World Cup)तयारी करण्यात व्यस्त आहे. त्यासाठी सराव म्हणून भारत पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश विरुद्ध सामना खेळत आहे. विश्वचषकाची अधिक तयारी म्हणून भारत दोन सराव सामने जादा खेळत आहे. याला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डने मान्यताही दिली आहे. या सामन्यादरम्यान भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
भारत 14 मुख्य सदस्यांसह ऑस्ट्रेलियाला गेला आहे. टी20 विश्वचषकातील भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध आहे. त्याआधी भारत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्ध प्रत्येकी एक-एक सराव सामना खेळणार आहे. भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हा सामना पाहण्यासही भारताच्या अनेक चाहत्यांनी हजेरी लावली. या सामन्यावेळी विराट कोहली (Virat Kohli) याने चाहत्यांना ऑटोग्राफ दिला आहे. कर्णधार रोहित शर्मा (RohitSharma) आणि विकेटकीपर रिषभ पंत यांनी सलामीला फलंदाजी केली.
Nice gesture from Virat Kohli to give autograph to fans ahead of the warm up match. pic.twitter.com/baQulbApg6
— Johns. (@CricCrazyJohns) October 10, 2022
भारताकडून या सराव सामन्यात विराट कोहली, केएल राहुल आणि आर अश्विन हे खेळणार नाहीत.
भारत ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी मोठा धक्का बसला होता. मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे या संपूर्ण स्पर्धेस मुकला आहे. त्याच्याजागी कोण खेळणार याचे नाव सध्यातरी बीसीसीआयने जाहीर केलेले नाही, मात्र मोहम्मद शमी याचा प्रबळ दावेदार आहे अशा चर्चा सुरू आहेत. तसेच तो आधीच विश्वचषकासाठीच्या संघात राखीव खेळाडू म्हणून सामील आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू-
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
किस्से क्रिकेटचे – ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या बाऊन्सरला उत्तर म्हणून ‘या’ भारतीय खेळाडूने चक्क मिशीच खेचली!
श्रेयस-इशानच्या तुफानाने मालिका बरोबरीत! रांची वनडेत टीम इंडिया वरचढ