ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेला टी20 विश्वचषक स्पर्धेचा 8वा हंगाम उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. अशात आता उपांत्य आणि अंतिम सामना खेळला जाणार आहे. पहिला उपांत्य सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात होईल. तसेच, दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात होईल. यजमान ऑस्ट्रेलिया संघ सुपर 12 फेरीतूनच स्पर्धेबाहेर पडला. आयसीसीने स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी नियम जाहीर केले आहेत. अशात पावसामुळे उपांत्य सामने झाले नाहीत, तर कोणत्या संघाला फायदा होईल? चला जाणून घेऊया…
आयसीसीने टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील दोन्ही उपांत्य सामन्यांसाठी आणि अंतिम साामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. पहिला उपांत्य सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) संघात 9 नोव्हेंबर रोजी सिडनी येथे होणार आहे. तसेच, दुसरा सामना 10 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड संघात ऍडलेड येथे होईल. जर हे सामने पावसामुळे थांबले, तर दुसऱ्या दिवशी सामना जिथे थांबला होता, तिथून सुरू होईल. तसेच, पावसामुळे दुसऱ्या दिवशीही सामना पूर्ण खेळला गेला नाही, तर गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेले संघ अंतिम सामन्यात पोहोचतील. अशा भारत आणि न्यूझीलंड संघांना फायदा मिळेल. न्यूझीलंड संघ पहिल्या गटात 7 गुणांसह, तर भारतीय संघ दुसऱ्या गटात 8 गुणांसह अव्वलस्थानी राहिला होता.
किमान 10 षटके खेळ होणे गरजेचे
नियमानुसार, साखळी फेरीत सामन्याच्या निकालासाठी दोन्ही संघांना कमीत कमी प्रत्येकी 5 षटके फलंदाजी करणे गरजेचे होते. मात्र, उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी या नियमात बदल करण्यात आला आहे. आता दोन्ही संघांना कमीत कमी प्रत्येकी 10 षटके फलंदाजी करावी लागेल. स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. पावसामुळे जर अंतिम सामना होऊ शकला नाही, तर एक संघ विजयी होणार नाही. आयसीसीच्या नियमानुसार, अशा परिस्थितीत संयुक्त विजेता म्हणून घोषित केले जाईल. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत कोणताही संयुक्त विजेता पाहायला मिळाला नाहीये.
विजेत्या संघाला बक्षीस किती मिळणार?
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ही 45 कोटी रुपये इतकी आहे. विजयी संघाला 13 कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला 6.5 कोटी रुपये बक्षीस रक्कम म्हणून मिळेल. उपांत्य सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला 3.26 कोटी, तर सुपर 12 फेरीतून बाहेर होणाऱ्या प्रत्येक संघांना 57 लाख रुपये मिळतील. (t20 world cup 2022 which team will play the final if there is no match due to rain Know more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटची फिटनेस भारीच, पण दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचने पुढच्या सहा वर्षांसाठी दिला ‘हा’ खास सल्ला
उर्वशी प्रकरण पंतच्या आलंय चांगलच अंगलट! आता चाहते तोंडावर म्हणू लागले…