---Advertisement---

शिवम दुबेचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! रिंकूला संघात न घेणं पडणार महागात?

On: सोमवार, जून 10, 2024 12:27 PM
Shivam-Dube-And-Rinku-Singh
---Advertisement---

भारतीय निवड समितीने रिंकू सिंगच्या जागी टी20 विश्वचषकात शिवम दुबेला संघात स्थान दिले आहे. दुबेने टी20 विश्वचषकापूर्वी आयपीएल 2024 च्या हंगामात सुरुवातीच्या काळात त्याची फाॅर्म चांगली होती पण भारतीय संघात निवड झाल्यापासून दुबेचा फाॅर्म जणू गायबच झाला आहे. त्याचीच अनुभूती भारत पाकिस्तान सामन्यातही पहायला मिळाली, त्याने 9 चेंडूत केवळ 3 धावा करुन आउट झाला.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भारतीय संघाचा भाग असलेला रिंकू सिंग विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग असेल आणि फिनिशरची भूमिका बजावेल, असे मानले जात होते. मात्र, या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघात रिंकूचे नाव नव्हते आणि शिवम दुबे भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला होताा.

कर्णधार रोहितने शिवमचा संघात समावेश करण्याच्या कारण आधीच स्पष्ट केले होते, मधल्या फळीत स्वतंत्रपणे खेळू शकणाऱ्या आणि गोलंदाजी पर्यायाचा विचार करत असल्याचे सांगितले होते. आयपीएलमधील पहिल्या काही सामन्यांच्या आधारे शिवमची निवड करण्यात आल्याचेही रोहितने सांगितले होते.

पाकिस्तानविरुद्ध भारतीय फलंदाजांची स्थिती चांगली नव्हती आणि त्यावेळी शिवमकडून संघाला चांगल्या खेळीची अपेक्षा होती, मात्र शिवमला या संधीचा फायदा उठवता आला नाही. शिवमला नसीम शाहने त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. शिवम पुन्हा एकदा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. याआधी बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यातही शिवम फलंदाजीत कामगिरी करु शकला नव्हता. आयर्लंडविरुद्धच्या संघाच्या पहिल्या सामन्यात शिवमला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

शिवम दुबेचा भारतीय संघात निवड झाल्या पासून तो दबावात खेळत असल्याचे म्हंटले जात आहे. त्याम्ळे फलंहाजीत तो संघर्ष करत आहे. मागील 8 टी 20 सामन्यातशिवम दुबे केवळ 62 धावा केल्या आहेत. भारतीय संघाला शिवमकडून मोठ्या अपेक्षा आहेत, मात्र आतापर्यंत तो अपेक्षा पूर्ण करु शकलेला नाही.

महत्तवाच्या बातम्या-

‘जागा बदलली पण निकाल तोच’, लाजिरवाण्या पराभवानंतर मास्टर ब्लास्टरने पाकिस्तानला डिवचलं; म्हणाला…
पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला नसीम शाह, मैदानावरचा व्हिडिओ व्हायरल
मोदींचा शपथविधी…पाकिस्तानचा पराभव…अन् जम्मू-काश्मीरमध्ये जल्लोष! पाहा सुंदर व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---