टी20 विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ बार्बाडोसहून भारतात आला आहे. आज सकाळी 6 च्या सुमारास भारतीय संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यावेळी चाहत्यांनी भारतीय खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले. भारतीय खेळाडूंच्या आगमनापूर्वीच नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये भारतीय चाहते खूप उत्साहित दिसत आहेत.
त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर रोहित शर्माने टी20 विश्वचषकाची ट्रॉफी उचलताच क्रिकेट चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या, चाहत्यांच्या आनंदाला सीमाच उरली नाही.
#WATCH | Captain Rohit Sharma with the #T20WorldCup trophy at Delhi airport as Team India arrives from Barbados, after winning the T20I World Cup.
(Earlier visuals) pic.twitter.com/ORNhSBIrtx
— ANI (@ANI) July 4, 2024
त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा बसमध्ये बसल्यानंतर देखील चाहत्यांच्या विनंतीमुळे पुन्हा एकदा ट्राॅफी उंचावला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सातत्याने कमेंट करून आपला आनंद व्यक्त करत आहेत.
Captain Rohit Sharma showing the Trophy to fans. 👌
– A great gesture by Hitman…!!! pic.twitter.com/VnXyg8u6ur
— Johns. (@CricCrazyJohns) July 4, 2024
भारतीय संघाने टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला होता. अशा प्रकारे भारतीय संघ दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक विजेता ठरला. याआधी 2007 मध्ये भारताने टी-20 विश्वचषक जिंकला होता. टीम इंडिया सकाळी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहे. तर संयाकाळी 4-7 दरम्यान भारतीय संघाचे खुल्या बसमधून विजयी टुर होईल. तर संध्याकाळी 7 नंतर वानखेडे स्टेडियम येथे बीसीसीआयने घोषीत केलेल्या 125 कोटी धानादेश संघाला वितरीत केले जाणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल, चाहत्यांनी केलं जंगी स्वागत
मुंबईतील टीम इंडियाची विजयी परेड घरबसल्या लाईव्ह कशी पाहता येणार? जाणून घ्या
धोनीच्या वाढदिवसाची ठिकठिकाणी जोरदार तयारी! या शहरांमध्ये होणार बायोपिकचं स्पेशल स्क्रिनिंग