येत्या ७ फेब्रुवारीपासून आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद गतविजेता भारत आणि श्रीलंकेला मिळाले आहे. टी२० विश्वचषकाची ही दहावी आवृत्ती असून याआधी झालेल्या हंगामांमध्ये सर्वाधिक सामने कोण जिंकले हे पाहू. त्याचबरोबर एक पेक्षा अधिक सामने न जिंकता आलेले संघही जाणून घेऊ.
टी२० विश्वचषकामध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान २००७ आणि २०२४चा विजेता संघ भारताचा आहे. या स्पर्धेत भारताने सर्व आवृत्त्या खेळल्या असून ३६ सामने जिंकले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर श्रीलंका असून त्यांनी ३३ सामने जिंकले आहेत, तर तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका असून त्यांनी ३२ सामने जिंकले आहे.
टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघांनी ३०-३० सामने जिंकले आहेत. इंग्लंडने २८ तर न्यूझीलंड आणि दोन वेळेचा टी२० विश्वचषक विजेता वेस्ट इंडिजने त्यानंतर अफगाणिस्तान आणि बांग्लादेश असून दोन्ही संघांनी प्रत्येकी १२-१२ सामने जिंकले आहेत.
नेदरलॅंड्सने १० सामने जिंकले असून झिम्बाब्वेने ८ सामने जिंकले आहेत. स्कॉटलंड आणि आयर्लंडने प्रत्येकी ७-७ सामने जिंकले आहेत. तसेच चार संघ असे आहेत ज्यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. यामध्ये कॅनडा, हॉंग कॉंग, युगांडा आणि युएईचा समावेश आहे.
यंदाच्या आवृत्ती २० देशाचे संघ खेळणार आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एवढे संघ खेळणार आहेत. या स्पर्धेतून बांग्लादेशने माघार घेतली असून अफगाणिस्तानला त्यांच्यापुढे जाण्याची संंधी आहे. त्याचबरोबर भारताची कामगिरी पाहता यजमानांना त्यांची आघाडी वाढवण्याची मोठी संधी आहे.
टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताचा संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, हर्षित राणा.






