---Advertisement---

असून अडचण, नसून खोळंबा! विश्वचषकापूर्वी स्टार खेळाडूंबद्दल विंडीजचा कर्णधार म्हणाला, ‘त्यांच्या नसण्याने…’

On: रविवार, ऑक्टोबर 16, 2022 6:20 PM
Nicholas-Pooran
---Advertisement---

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकाचे दोन विजेतेपद पटकावले आहेत. मात्र, 2022च्या 8व्या टी20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाला अनुभवी खेळाडूंची कमतरता भासणार आहे. या स्पर्धेत ख्रिस गेल, ड्वेन ब्रावो, कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल आणि सुनील नारायण यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश नसेल. विशेष म्हणजे, विश्वचषकाआधीच संघाचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायर हादेखील स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कारण, त्याला वेळेवर फ्लाईट पकडता आली नव्हती. त्यामुळे एकप्रकारे असे म्हटले जाऊ शकते की, वेस्ट इंडिज संघ या विश्वचषकात संघर्ष करताना दिसू शकतो.

वेस्ट इंडिज संघ त्यांच्या विस्फोटक अंदाजासाठी ओळखला जातो. मात्र, यावेळी त्यांच्याकडे कोणताही मोठा खेळाडू नाहीये. असे असले, तरीही संघाचा युवा कर्णधार निकोलस पूरन याला अपेक्षा आहे की, संघात जरी मोठे खेळाडू नसले, तरीही संघ चांगला आहे आणि आगामी विश्वचषकात दमदार प्रदर्शन करेल.

वेस्ट इंडिज संघ पहिल्या राऊंडमध्ये भाग घेत आहे. यामध्ये त्यांना 3 सामने खेळायचे आहेत. यामधूनच ते सुपर 12 फेरीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतील. स्कॉटलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात निकोलस पूरन याने त्याच्या युवा खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, “माझ्या मते संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा ताळमेळ आहे. तुम्ही लक्ष दिले, तर दोन वेळा विश्वचषक चॅम्पियन बनताना आमच्याकडे मोठे नाव होते. हीच नावे मागील वर्षीही संघात होती, पण आम्ही विश्वचषक जिंकू शकलो नाही.”

निकोलस पूरन पुढे बोलताना म्हणाला की, “मागील वर्षी ऑस्ट्रेलियानेही विश्वचषक जिंकला होता. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे त्यावेळी मोठे खेळाडूही नव्हते, पण तरीही त्यांनी विश्वचषक जिंकला होता. जर आमच्याबद्दल बोलायचं झालं, तर आमच्याकडेही मोठे खेळाडू नाहीयेत. मात्र, तरीही आमच्याकडे एक चांगला संघ तयार आहे. जोपर्यंत सर्व खेळाडू एकमेकांसाठी खेळतील आणि एकत्र राहतील, तेव्हा सर्वकाही ठीक राहील.”

वेस्ट इंडिजचा पहिला सामना सोमवारी (दि. 16 ऑक्टोबर) स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे. तसेच, त्यांचा दुसरा सामना झिम्बाब्वेविरुद्ध, तर तिसरा आणि शेवटचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. वेस्ट इंडिज संघ सध्या या सामन्यात शानदार प्रदर्शन करून सुपर 12मध्ये आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नेदरलँड्सचा दमदार विजय, यूएईचा 3 विकेट्सने पराभव
आशिया चषक जिंकून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या हरमनप्रीतच्या मनात बसली ‘ही’ छोटी मुलगी, शॉट्स पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---