---Advertisement---

‘अरे, हा तर चक्क माही’! धोनीला प्रत्यक्षात पाहून युवा पाकिस्तानी गोलंदाज अतिआनंदीत, साधला संवाद

On: शनिवार, ऑक्टोबर 23, 2021 2:16 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध पाकिस्तान या संघांतील सामना म्हटलं की, चाहत्यांसह क्रिकेटपटूंच्याही भावनांचा बांध फुटतो. त्यातही केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हे संघ आमने सामने येत असतात. त्यामुळे चाहत्यांना उभय संघातील सामन्याची प्रतिक्षा लागून असते. यंदा आयसीसीच्या टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारताची पहिलीच लढत पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. रविवार रोजी (२४ ऑक्टोबर) दुबई येथे होणाऱ्या या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत. याचदरम्यान पाकिस्तानचा गोलंदाज शाहनवाज दहानी याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सराव सत्रात व्यस्त असलेल्या दहानीला अचानक ‘कॅप्टनकूल’ धोनी दिसल्याने तो स्वत:ला त्याला बोलण्यापासून थांबवू शकला नाही. याच प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

त्याचे झाले असे की, भारतीय संघाचा मार्गदर्शक धोनी सराव सत्रानंतर संघाच्या दुबईतील हॉटेलकडे परत जात होता. या हॉटेलकडे जातानाच्या रस्त्यावर मध्ये पाकिस्तानी खेळाडूंचे सराव करण्याचे मैदान लागते. धोनी याच मैदानालगतच्या रस्त्याने जात असताना पाकिस्तानचा युवा गोलंदाज दहानीची नजर त्याच्यावर पडली आणि तो धोनीला बोलण्यासाठी उतावीळ झाला. अगदी धोनीही आपल्या या चाहत्याला नाराज करत नाही. तो चालत-चालत दहानीशी संवाद साधताना दिसतो आहे.

सोशल मीडियावर त्यांच्यातील या संवादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दिसते की, दहानी धोनीसोबत बोलताना सर्वप्रथम आपली ओळख करुन देतो. तो म्हणतो की, “तुम्ही धोनी आहात आणि मी दहानी आहे.” यावर धोनी मान हालवत हो अशी प्रतिक्रिया देतो. पुढे त्यांच्यात काही मिनिटांचा संवाद होताना दिसतो आहे.

https://twitter.com/DhoniArmyTN/status/1451806214220697604?s=20

पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहनवाज दहानी याचे अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण झालेले नाही. परंतु पाकिस्तान सुपर लीगमधील आपल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर त्याने थेट टी२० विश्वचषक संघात जागा मिळवली आहे. तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुल्तान्स सुल्तान या संघाचा भाग राहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी माजी क्रिकेटरने निवडली भारताची अंतिम एकादश, भुवीसह ‘या’ खेळाडूंना नारळ

‘हे’ ट्विट करून फसला विराट; चाहत्यांनी घेतले फैलावर

नशीब बलवत्तर! एकाच चेंडूवर ३ वेळा धावबाद होण्यापासून फलंदाज, बघा टी२० विश्वचषकातील ‘कॉमेडी एरर’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---