टी-२० विश्वचषकात मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळला गेला. हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ८ विकेट्सच्या नुकसानावर १३४ धावा केल्या. या सामन्यात पाकिस्तानच्या हॅरिस रौफने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले.
त्याने या सामन्यात न्यूझीलंडच्या चार विकेट्स घेतल्या. तसेच ५.५० च्या उत्कृष्ट इकोनॉमीने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या २२ धावा दिल्या. त्याने या सामन्यात मार्टिन गप्टिलला एक अप्रतिम चेंडू टाकला, ज्यावर तो त्रिफळाचीत झाला.
रौफने गप्टिल फलंदाजी करत असताना न्यूझीलंडच्या डावाच्या सहाव्या षटकात १४९ किमी दर ताशीच्या वेगाने एक चेंडू फेकला. या चेंडूचा सामना करावा लागल्यामुळे गप्टिल हैराण झाला होता. अशातच रौफच्या पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. गप्टिल रौफच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. गप्टिल या चेंडूवर पुढे येऊन मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होता, पण रौफने तो चेंडू जास्त वेगात टाकला आणि गप्टिलला चकवा दिला. गप्टिल चेंडूला बॅटवर घेऊ शकला नाही आणि क्लीन बोल्ड झाला.
आयसीसीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून रौफने टाकलेल्या या चेंडूचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. आयसीसीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “रौफने त्याच्या षटकातील पहिलाच चेंडू १४९ किमी प्रती तासाच्या वेगाने फेकला आणि पुढच्या चेंडूवर मार्टिन गप्टिलचा डाव समाप्त केला.” आयसीसीने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी प्रचंड व्हायरल केले आहे आणि त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
https://www.instagram.com/reel/CVfspoAFkyQ/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यान, सामन्यात न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विलियम्सनने २६ चेंडूत २५ धावा, डेरिल मिशेलने २० चेंडूत २७ धावा केल्या. याव्यतिरिक्त रौफच्या चेंडूवर बाद झालेला मार्टिन गप्टिल २० चेंडूत केवळ १७ धावा करू शकला. पाकिस्तानने सामन्यात पाच विकेट्स राखून विजय मिळवला. हॅरिस रौफला त्याच्या उत्कृष्ठ गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे, हे काय झालं? शोएब मलिकला अडवता आला नाही साधा चेंडू, गप्टिलला फुकटात दिल्या ४ धावा
कमी पण तितकेच समर्पक शब्द, मोहम्मद शमीवर पातळी सोडून टीका करणाऱ्यांना बीसीसीआयने सुनावलं
शमीच नव्हे ‘या’ दिग्गजालाही करावा लागलेला चाहत्यांच्या रोषाचा सामना, स्वत:ला घरामध्ये केले होते कैद






