भारताच्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022ची खरी सुरूवात 23 ऑक्टोबरला होणार आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान हे सुपर 12च्या एकाच गटात आहे. हे दोन्ही संघ रविवारी (23 ऑक्टोबर) समोरासमोर येणार आहेत. मेलबर्न येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताच्या अंतिम अकरामध्ये दिनेश कार्तिक कि रिषभ पंत यांच्या नावावरून चर्चा सुरू आहे, मात्र मागील काही सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्मा याने कार्तिकवर अधिक विश्वास दाखवला आहे. यामुळे पाकिस्तानविरुद्ध कार्तिकच खेळणार असे तर्कवितर्क लावले जात आहे. याने निराश न होता पंतने पाकिस्तानविरुद्ध खेळण्याआधी मनात काय चलबिचल सुरू असते हे सांगितले आहे.
आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत भारताचा युवा विकेटकीपर रिषभ पंत (Rishabh Pant) याने पाकिस्तान विरुद्ध खेळण्याचा अनुभव सांगितला आहे. त्याने म्हटले, “पाकिस्तानविरुद्ध खेळणे हे नेहमीच खास असते, कारण त्या सामन्याबाबत प्रत्येकवेळी वेगळ्याच प्रकारच्या चर्चा सुरू असतात. या सामन्यात केवळ खेळाडूंची नाहीतर चाहते आणि अनेकाच्या भावना असतात. तेव्हा एक वेगळीच वातावरणनिर्मीती तयार होते. राष्ट्रगीत म्हणत होतो, तेव्हा खरचं अंगावर शहारे उभे राहिले होते.”
भारत-पाकिस्तान जेव्हा 2021च्या टी20 विश्वचषकात भिडले होते तेव्हा पाकिस्तानने 10 विकेट्सने सहज तो सामना जिंकला होता. वरच्या फळीने पूर्णपणे निराशा केल्याने विराट कोहली आणि पंत यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला 151 धावसंख्या उभारून दिली. त्यावेळी पंतने 30 चेंडूत 39 धावा केल्या होत्या.
पंतने विराटसोबतच्या भागीदारीबाबत म्हटले, “विराट तुम्हाला परिस्थितीतून कसे जायचे हे शिकवतो, जे तुम्हाला तुमच्या पुढील क्रिकेटच्या प्रवासात मदत करेल. त्यामुळे नेहमीप्रमाणेच त्याच्यासोबत फलंदाजी करणे उत्तम आहे. फलंदाजी करताना आपल्यासोबत एखादा सर्वाधिक अनुभव असणारा फलंदाज असला तर अधिक चांगले असते, कारण तुमच्यावर प्रत्येक चेंडूवर धावा करण्याचा दबाव असतो.”
पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून भारताला या विश्वचषकात विजयी सुरूवात करायची आहे. तसेच पंत हा मागील काही टी20 सामन्यात निराशाजनक ठरला आहे. यामुळे तो पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही हे निश्चित नाही. त्याने कसोटीमध्ये जरी ऑस्ट्रेलियाचे मैदान गाजवले असले तरी टी20 विश्वचषकात तो कसा खेळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
HBD विरू: तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’
याला काय अर्थय! रोवमनच्या चुकीमुळे सहकारी झाला बाद, वरून त्यालाच दाखवला आपला राग; पाहा व्हिडिओ