यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाची (ICC T20 World Cup) सुरुवात रोमांचक झाली आहे. भारतीय संघानं न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. परंतु न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावरील खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिग्गज खेळाडू या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करत आहेत.
नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टीवर चेंडू अचानक उसळी घेताना दिसत आहे. त्यामुळे फलंदाजांसाठी अडचणी निर्णाण होत आहेत. (9 जून) रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना याच मैदानावर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी चर्चा होताना दिसत आहेत की, आयसीसी (ICC) हा सामना दुसऱ्या मैदानावर खेळवणार आहे. परंतु आयसीसीनं यावरती अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. आयसीसीनं आधीच घोेषण केली आहे की, वेळापत्रकानुसार सामने ठरलेल्या ठिकाणीच होतील.
आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, न्यूयाॅर्कमध्ये राहिलेले सामने इतर कोणत्याही मैदानावर खेळवण्याची योजना अद्याप आखली नाही.
यंदाच्या टी20 विश्वचषकातील दोन सामने नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळले गेले. या मैदानावरील खेळपट्ट्या ड्राॅप-इन प्रकारच्या आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या मैदानावर पहिला सामना श्रीलंका विरुद्ध दक्षिण अफ्रीका यांच्यामध्ये खेळला गेला. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची धावसंख्या सर्वबाद 77 झाली. तर दुसरा सामना भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये खेळला गेला. यामध्ये आयर्लंडची धावसंख्या सर्वबाद 96 झाली होती. दोन्हीही संघ 100 धावांचा आकडा गाठू शकले नाहीत.
आयसीसीनं ठरवलेल्या यंदाच्या टी20 विश्वचषकातील 55 पैकी 16 सामने अमेरिकेत (America) होणार आहेत. तर राहिलेले सर्व सामने वेस्ट इंडीजमध्ये (West Indies) होणार आहेत. सेमीफायनल आणि फायनल सामनेदेखील वेस्ट इंडीजच्या मैदानावर खेळले जाणार आहेत. आयसीसीनं 250 करोड रुपयांच्या मदतीनं अमेरिकेत स्टेडियम बनवलं आहे आणि 10 खेळपट्ट्या ऑस्ट्रेलियाच्या एडिलेड मैदानावरुन मागवल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
2023च्या विश्वचषकाबद्दल कर्णधार रोहित शर्मानंं केला मोठा खुलासा!
पाकिस्तान सावध राहा! अमेरिकेचा वादळ येणार, कर्णधार मोनांक पटेलने दिला इशारा
रोहित समोर गेल, धोनीही फेल ‘हिटमॅनने’ गाठला 600 षटकारांचा आकडा!