ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) घोषित केले आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियातील ७ शहरांमध्ये १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. साखळी सामने दोन फेरीत पार पडणार आहेत. आधी पहिली फेरी होईल आणि नंतर सुपर १२ फेरी पार पडेल. त्यानंतर बाद फेरीचे सामने होणार आहेत.
या टी२० विश्वचषक २०२२ मधील सुपर १२ फेरीसाठी यजमान ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त आयसीसीच्या टी२० क्रमवारीनुसार न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे ८ संघ थेट पात्र ठरले आहेत. तसेच पहिल्या फेरीसाठी श्रीलंका, वेस्ट इंडिज, नामिबिया आणि स्कॉटलंड खेळतील. अन्य ४ संघ २ पात्रता स्पर्धेतून पहिल्या फेरीसाठी पात्र ठरतील.
आयसीसीने जाहीर केलेल्या गटवारीनुसार सुपर १२ फेरीसाठी इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांचा ‘गट एक’ मध्ये समावेश आहे, तर भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश ‘गट दोन’ मध्ये आहेत. या दोन्ही गटात पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे प्रत्येकी २ संघ सामील होतील.
असे होणार भारताचे सामने
भारताने सुपर १२ फेरीत थेट प्रवेश केला असल्याने २३ ऑक्टोबर रोजी संघाचा पहिला सामना होईल. भारत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने या स्पर्धेतील आपल्या अभियानाला सुरुवात करेल. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.
त्यानंतर सिडनीमध्ये भारताचा दुसरा सामना २७ ऑक्टोबर रोजी पहिल्या फेरीतून गट अ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाशी सामना होईल. तर तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३० ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये होईल. यानंतर बांगलादेशविरुद्ध २ नोव्हेंबर रोजी ऍडलेडला होईल. तसेच सुपर १२ फेरीतील भारताला अखेरचा सामना पहिल्या फेरीतून गट ब मध्ये अव्वल राहिलेल्या संघाशी ६ नोव्हेंबर रोजी मेलबर्नला होईल.
अधिक वाचा – टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक घोषित; भारत-पाकिस्तान सामना रंगणार ‘या’ दिवशी
रोहित करणार भारताचे नेतृत्त्व
संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे झालेल्या सातव्या टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये विराट कोहलीने भारताच्या टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडले होते. त्यानंतर त्याच्याकडून वनडे कर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. त्यामुळे त्याच्याऐवजी रोहित शर्माकडे भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे नियमित नेतृत्त्वपद देण्यात आले.
त्यामुळे आता ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आठव्या टी२० विश्वचषकात रोहित शर्मा भारताचे नेतृत्त्व करताना दिसू शकतो. तसेच तो टी२० विश्वचषकात भारताचे नेतृत्त्व करणारा तिसरा कर्णधारही ठरू शकतो. यापूर्वी एमएस धोनीने ६ टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताचे कर्णधारपद सांभाळले होते, तर विराट कोहली याने एका टी२० विश्वचषकात भारताचे नेतृत्त्व केले आहे.
व्हिडिओ पाहा – २०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही
अशी असेल स्पर्धेची रुपरेषा
टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत टी२० क्रमवारीत अव्वल ८ स्थानांवर असलेले संघ थेट सुपर १२ च्या फेरीत खेळतील. तर अन्य ८ संघांमध्ये पहिली फेरी पार पडेल. त्यातील ४ संघ (प्रत्येक गटातील अव्वल २ संघ) सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीत १२ संघांची २ गटात विभागणी केली आहे. म्हणजे प्रत्येक गटात ६ संघ असतील.
सुपर १२ च्या फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी एकमेकांसमोर येतील.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठा बातमीः भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने, याचवर्षी ‘या’ दिवशी खेळणार सामना
“स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे…” बीबीएल पदार्पणानंतर उन्मुक्त झाला भावूक
पुजारा-रहाणेचे ‘बुरे दिन’ सुरू! संघातील जागा तर जाणारच सोबत आर्थिक नुकसानही पक्के