भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. विश्वचषक अभियानाची सुरुवात भारत 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत करणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण त्याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचा एक खास व्हिडिओ व्हिडिओ समोर आला आहे. रोहित या व्हिडिओत कसून सराव करताना दिसत आहे.
भारताला टी-20 विश्वचषक 2022 (T20WC2022) मधील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी संघातील सर्व खेळाडूंनी जोरदार सराव केला आहे. शुक्रवार (21 ऑक्टोबर) संघाचे ऐच्छिक सराव सत्र पार पडले. या सराव सत्रात विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, केएल राहुल, हर्षल पटेल, हार्दिक पंड्या आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंनी माघार घेतली. पण कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र नेट्समध्ये घाम गाळताना दिसला.
https://twitter.com/ESPNcricinfo/status/1583310105315274752?s=20&t=4TU1rChwAKbbih9Z7paKbA
इतर जवळपास सर्व खेळाडूंना सराव या ऐच्छिक सराव सत्रातून माघार घेतली असताना रोहितने मात्र सराव केला. यावरून तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी किती उत्सुक आहे, हे मसजू शकते. मागच्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता रोहित शर्मा या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल. ऐच्छिक सराव सत्र असले तरी, रोहित दोन वेळा फलंदाजीसाठी नेट्समध्ये आला. पहिल्यांता आल्यानंतर त्याने संयमी खेळी दाखवला, पण दुसऱ्यांता नेट्समध्ये आल्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधून मोठमोठे शॉस्ट निघत होते. यादरम्यान अनेक चेंडू सीमारेषेपार देखील गेले असते.
भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियातील मैदानांची सीमारेषा जास्त लांब असते. अशात फलंदाजाला षटकार किंवा चौकार मारण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे लागतात. षटकार मारण्यासाठी अधिकची मेहनत घ्यावी लागणार म्हटल्यानंतर फलंदाजांना सराव देखील अधिकचा करणे गरजेचे असावे, जे रोहितने जाणले आहे. विश्वचषक अभियानाची सुरुवात करण्यापूर्वी भारताने यजमान ऑस्ट्रेलियासोबत सराव सामना खेळला आणि जिंकला देखील. भारताने हा सामना 6 धावांनी जिकला असला, तरी रोहित काही खास कामगिरी करू शकला नाही. आता विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध वादळी खेळी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
डेविड वॉर्नर लवकरच होणार निवृत्त! ‘या’ विश्वचषकापर्यंत खेळण्याचा असेल प्रयत्न
प्रो कबड्डी: शानदार शुक्रवारी मुंबई-पुण्याचे ‘दमदार’ विजय; पलटणचा तिसऱ्या क्रमांकावर कब्जा






