---Advertisement---

बुमराहची जागा घेण्यासाठी शमी पूर्णपणे फिट आहे का? रोहित शर्माने दिली मोठी अपडेट

On: शनिवार, ऑक्टोबर 15, 2022 10:22 PM
Mohammad Shami
---Advertisement---

शुक्रवारी (14 ऑक्टोबर) मोहम्मद शमी टी-20 विश्वचषकात खेळणार असल्याची अधिकृत घोषणा बीसीसीआयने केली. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक खेळत नाहीये. अशात शमीला त्याच्या बदली खेळाडूच्या रूपात संघात स्थान दिले गेले आहे. शमी मागच्या मोठ्या काळापासून टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळला नाहीये. तसेच कोरोनातून सावरल्यानंतर त्याच्या फिटनेसविषयी देखील चाहत्यांना प्रश्न आहेत. आता कर्णधार रोहित शर्मा याने शमीच्या फिटनेसविषयी महत्वाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आशिया चषक 2022 मध्येही दुखापतीच्या कारणास्तव खेळू शकला नव्हता. त्यांतर भारताने मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बुमराहने मैदानात पुनरागमन केले, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला पुन्हा दुखापत झाल्याचे समोर आले. याच कारणासत्वर बुमराह आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत बाहेर झाला आणि नंतर टी-20 विश्वचषकातून. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) यालाही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडले गेले होते, पण ऐन वेळी कोरोनाची लागण झाल्याने तो या मालिकांमध्ये खेळू शकला नाही.

रोहितने दिली शमीच्या फिटनेसविषयी माहिती –
असे असले तरी, शमी आगामी टी-20 विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार आहे. शमीच्या फिटनेसची माहिती देताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आम्ही उद्या (रविवार) सराव सत्रात भाग घेणार आहोत. तो रविवारी संघासोबत सराव करेल. आम्ही शमीविषयी जे काही ऐकले आहे. ते खूप सकारात्मक आहे. कोरोनानंतर त्याने चांगले पुनरागमन केले आहे. त्याने 3-4 चांगले सराव सत्र केले आहेत. शमीविषयी आता सर्वकाही चांगलेच वाटत आहे.”

दरम्यान, विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारताला पहिला सरवा सामना 17 ऑक्टोबरला जयमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. तत्पूर्वी रविवारी संघाचे सराव सत्र पार पडले. दरम्यान, बीसीसीआयने सर्वात पहिल्यांदा जेव्हा टी-20 विश्वचषकासाठी संघ घोषित केला, तेव्हा शमी राखीव खेळाडूंमध्ये होता, पण आता त्याला 15 सदस्यांच्या मुख्य संघात संधी दिली गेली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी-20 विश्वचषकात ‘या’ तिघांचे प्रदर्शन विसरता येणार नाही, एका हंगामात केल्यात सर्वाधिक धावा
आता दादा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात! स्वतः दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---